मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

क्षुल्लक कारणावरून विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके

क्षुल्लक कारणावरून विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके

एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी एका क्षुल्लक कारणावरून नरक यातना दिल्या आहेत. (File Photo)

एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी एका क्षुल्लक कारणावरून नरक यातना दिल्या आहेत. (File Photo)

Crime in Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील वसमत याठिकाणी अमानुषतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी एका क्षुल्लक कारणावरून नरक यातना दिल्या आहेत.

    वसमत, 21 सप्टेंबर: हिंगोली जिल्ह्यातील वसमत याठिकाणी अमानुषतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी एका क्षुल्लक कारणावरून नरक यातना दिल्या आहेत. आरोपींनी गॅसवर चमचा, भातवडी गरम करून पीडितेच्या गालावर आणि हाता-पायावर चटके दिले आहेत. या संतापजनक घटनेनंतर पीडितेनं वसमत शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. फरीन इरफान कुरेशी असं अत्याचार झालेल्या 23 वर्षीय फिर्यादीचं नाव आहे. तर इरफान शिकूर कुरेशी, अनीसा शिकूर कुरेशी आणि आलिया इर्शाद कुरेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहे. पीडित विवाहितेनं कसलं तरी रेकॉर्डिंग आपल्या बहिणीला आणि वडिलांना पाठवलं होतं. याची माहिती आरोपी पतीसह सासरच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर आरोपींनी पीडितेचा छळ करायला सुरुवात केली. हेही वाचा-मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग;कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग यानंतर आरोपी पतीन फिर्यादी विवाहितेला बेल्टने जबरी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण एवढ्यावरच मिटलं नाही तर, सासरच्या मंडळींनी गॅसवर चमचा आणि भातवडी गरम करून पीडितेच्या गालावर, हातावर आणि पायावर चटके दिले आहे. या संतापजनक घटनेत पीडितेचं सर्वांग भाजलं आहे. हेही वाचा-मुलीच्या अंगातून भूत उतरवण्याच्या बहाण्याने बलात्कार; आईनेच केली भोंदूबाबाला मदत या संतापजनक घटनेनंतर पीडित विवाहितेनं वसमत शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास वसमत पोलीस करत आहे. एका क्षुल्लक कारणातून दिलेली भयंकर शिक्षा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या