• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

Fake baba raped minor girl in bhiwandi: एका अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  भिवंडी, 21 सप्टेंबर : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच कारण म्हणजे महिला अत्याचाराच्या घटना कमी होण्याच्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आता ठाणे जिल्ह्यातील (Thane district) भिवंडीतून (Bhiwandi) एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या अंगात काकाचे भूत शिरल्याचं सांगत एका अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाने बलात्कार (Fake baba rape on minor girl) केला. या संपूर्ण कृत्त्यात भोंदूबाबाला पीडित मुलीच्या आईने मदत केल्याचं समोर आलं आहे. 16 वर्षीय मुलीच्या अंगात मृत काकाचं भूत शिरल्याचं सांगत ते काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर जंगलात बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत भोंदूबाबा सोबतच त्याला मदत करणाऱ्या पीडित मुलीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय मुलीची मान दुखत होती. यावर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुद्धा करण्यात आले मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यानंतर त्यांच्या एक ओळखीच्या व्यक्तीसोबत पीडित मुलीची आई तिला घेऊन एका भोंदूबाबाकडे गेले. पीडित मुलीच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. यावरुन भोंदूबाबाने दावा केला की, पीडित मुलीच्या अंगात काकाची भूत आहे आणि ते भूत बाहेर काढावे लागेल. पुणे हादरलं: मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग; कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग नंतर या भोंदूबाबाने पीडित मुलीला जवळील जंगलात नेते आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा याच्यासह पीडित मुलीची आई आणि त्यांच्या परिचयाचा एक व्यक्ती अशा तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या सोबतच महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा, जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भोंदूबाबाचे नाव शांताराम शेळके असे असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. उल्हासनगरात मामानेच केला 6 वर्षीय अल्पवयीन भाचीवर अत्याचार उल्हासनगरमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना ताजी असताना आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका मामाने आपल्या भाचीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या नराधम मामाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर मामानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात लहान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण म्हणजे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: