जळगाव, 27 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गलंगी येथे किरकोळ भांडणावरून मुलाने सावत्र आईचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा घालून हत्या केली आहे. गलंगी येथील खळ्यात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील मुलाचे आणि वडीलांचे भांडण झाले. यानंतर सावत्र आई मध्ये येत तू येथून निघून जा म्हणताच त्या मुलाला राग आला यातून त्याने खून केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या गलंगी गावात एक आदिवासी कुटूंब राहते. सावत्र आईने मुलाला रागावल्याने मुलाने थेट डोक्यात लाकडी दांडा घालून खून केला. वडीलांचे आणि मुलाचे भांडण सुरू असताना सावत्र आईने त्याला सांगितलं की तू इथून निघून जा याचा राग आल्याने सावत्र मुलगा दीपक उर्फ मगन पावरा (वय 28) याने खून केला. दरम्यान सावत्र आणि खाटावर झोपलेली असल्याचा अंदाज घेत दीपक लाकडी दांडका घालून गंभीर दुखापत केले. काही काळाने सावत्र आई सहाबाई यांचा मृत्यू झाला. दीपक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : ‘तुझ्यासाठी मी बऱ्याच मुली सोडल्या’ इंस्टावर ओळख झालेल्या विवाहितेचा विनयभंग
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत नेमका प्रकार जाणून घेतला. मयत महिलेचा संशयीत मुलगा यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पेालीसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती मिळाली आहे.
मुले पळवणारी म्हणून एका तृथीयपंथीला अमानूष मारहाण
जळगाव जामोद परिसरात मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. यावरून एका तृतीय पंथीला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Jalgaon Crime) दरम्यान त्या तृतीय पंथीला मारहाण करत असताना बाकीच्या लोकांनी बघ्याची भुमीका निभावल्याने नेमका गुन्हा कोणी केला यावर तर्क वितर्क लढवला जात आहे. ही घटना 14 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद येथे घडली.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार अडचणीत, विजय साळवींना तडीपारीची नोटीस
सविस्तर माहिती असे की, मलकापूर येथील रहिवाशी सायरा मोगरा जान (वय 20) भिक्षा मागण्याचे काम करून गावोगावी जाऊन दुकानावर व बाजारात दक्षिणा मागत असते. दरम्यान 14 सप्टेंबर रोजी सायरा मोगरा जान व रेणुका जान हे दक्षिणा मागण्यासाठी जळगाव जामोदला आल्या त्यानंतर जामोदचा बाजार असल्याने तेथून भिक्षा घेऊन एका रिक्षामध्ये बसून जुने बसस्टँडवर दुपारी 4 च्या सुमारास पोहोचले.