मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Crime : ‘तुझ्यासाठी मी बऱ्याच मुली सोडल्या’ इंस्टावर ओळख झालेल्या विवाहितेचा विनयभंग

Aurangabad Crime : ‘तुझ्यासाठी मी बऱ्याच मुली सोडल्या’ इंस्टावर ओळख झालेल्या विवाहितेचा विनयभंग

विवाहितेचा पाठलाग करत तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या असे म्हणत अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणा विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Aurangabad Crime)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

औरंगाबाद, 27 सप्टेंबर : इंस्टाग्रमावर ओळख झालेल्या विवाहितेचा पाठलाग करत तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या असे म्हणत अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणा विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयूर भागवत धनावडे असे आरोपीचे नाव आहे. एका विवाहितेची इंस्टाग्रामवर मयुर सोबत ओळख झाली होती. या ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता.

विवाहितेचे आरोपीस बोलण्याची इच्छा नसतानाही त्याने पाठलाग सुरुच ठेवला. आरोपीने विवाहितेकडे जाऊन, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढून घेत अश्लिल वर्तन केले. तेव्हा विवाहितेने आरोपीला विरोध केला असता, त्याने शिविगाळ केली.

हे ही वाचा : Mercedes ने केले 2 तुकडे; सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर आलिशान कारचा आणखी एक भयंकर VIDEO

तसेच तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुला व तुझा पती, मुलगा आणि आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सिडको पोलीस करीत आहेत. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास एन 5 सिडकोतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपीने विवाहितेकडे जाऊन म्हणाला, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढुन घेत अश्लिल वर्तन केले.

एका आठवड्यात दुसरी घटना…

महिलेस शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना कळंब-अंबाजोगाई रस्त्यावरील कानडी बदन (ता. केज) फाट्यावर बुधवारी (दि. 21) दुपारी घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एका 45 वर्षीय महिला सरपण आणण्यासाठी बुधवारी गेली होती.

हे ही  वाचा : PFI संघटनेभोवती फास आवळला, औरंगाबाद, नांदेडमध्ये ATS चे छापे, अनेक जण अटकेत

कानडी बदन (ता. केज) फाट्यावर ती महिला थांबली असता भगीरथ बापूराव भुंबे ( रा. डिघोळअंबा, ता. अंबाजोगाई) हा दुचाकीवरून महिलेजवळ आला व विनयभंग केला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात जमादार सीताराम डोंगरे हे पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime news