मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'हिंमत असेल तर निलेश-नितेश यांनी खुल्या मैदानात यावं'; नारायण राणेंच्या सुपूत्रांना खुलं चॅलेंज

'हिंमत असेल तर निलेश-नितेश यांनी खुल्या मैदानात यावं'; नारायण राणेंच्या सुपूत्रांना खुलं चॅलेंज

'त्यावेळी शिवसैनिकांना घाबरून कार्यालयात शटर ओढुन लपुन बसलेले नितेश राणे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. '

'त्यावेळी शिवसैनिकांना घाबरून कार्यालयात शटर ओढुन लपुन बसलेले नितेश राणे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. '

'त्यावेळी शिवसैनिकांना घाबरून कार्यालयात शटर ओढुन लपुन बसलेले नितेश राणे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. '

सिंधुदुर्ग, 20 जून : गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना विरुद्ध राणे हा वाद जनता पाहत आहे. नारायण राणेंसह त्यांच्या दोन्ही सुपूत्रांनी भाजपत प्रदेश केल्यानंतर टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे. अशात आता एका शिवसेना नेत्याने राणे पुत्रांना खुलं आव्हान दिलं आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावे, असं खुलं चॅलेंज दिलं आहे. सध्या त्यांची फेसबुक पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

नारायण राणे पिता-पूत्र आणि शिवसेना यांच्यातील वाद हा उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची कोणतीही संधी राणे पिता-पूत्र सातत्याने टीका करतात. तर शिवसेनेकडूनही सातत्याने राणे पिता-पूत्रांना शह देण्याचा प्रयत्न कोकणात सुरू असतो.

हे ही वाचा-प्रताप सरनाईक यांच्या स्फोटक पत्रामुळे सेनेत खळबळ, वरिष्ठ नेत्याची प्रतिक्रिया

'शटर ओढुन लपुन बसलेले नितेश राणे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले...'

कुडाळच्या रणांगणात कुणी कुणाला प्रसाद दिला, हे नितेश राणेंना मुंबईतल्या 'अधीश' बंगल्यात बसुन समजणार नाही. त्यासाठी त्यांनी आज षंढपणा सोडुन कुडाळच्या रणांगणात उतरण्याची हिंमत दाखवायला हवी होती. म्हणजे त्यांना सुद्धा शिवप्रसादाची चव चाखायला मिळाली असती. दहा वर्षापुर्वी वेंगुर्ला शहरात झालेल्या राड्यामध्ये नितेश राणेंनी शिवप्रसादाची चव चाखली होती. त्यावेळी शिवसैनिकांना घाबरून कार्यालयात शटर ओढुन लपुन बसलेले नितेश राणे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. तरण्याबांड मुलाची "बाबा मला वाचवा..." अशी मदतीची आर्त हाक ऐकुन शेवटी म्हाताऱ्या बापाला लाठ्या काठ्या, सोड्याची बॉटल, तलवारी घेऊन मैदानात उतरावे लागले होते. एका बापासाठी यापेक्षा वेगळे दुर्दैव ते कोणते...? शिवसैनिकांशी मैदानात सामना होतो तेव्हा वडीलांच्या मागे लपुन मदतीची याचना करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भित्र्या आणि पळपुट्या मुलाने घरात बसुन शिवसेनेसमोर फूसक्या वल्गना करू नयेत. ट्विटरवर बसुन टिव्हटिव्ह करण्याव्यतिरिक्त ते कोणत्याही रस्त्यावरच्या लढाईत उतरू शकत नाहीत, हे एव्हाना त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळून चुकले आहे. त्यांच्यासारखीच गत त्यांचे मोठे बंधु असलेल्या निलेश राणेंची आहे. कोणत्याही आंदोलनात किंवा राड्यात नेतृत्व करायची किंवा हाणामारी करायची वेळ आली की निलेश व नितेश हे दोघेही बंधु शेपुट आत घालुन पळ काढतात आणि बिळात जावुन लपतात. नेहमीच कार्यकर्त्यांना मार खाण्यासाठी मैदानात सोडुन हे दोघेही भाऊ पळपुटेपणा करतात. इतिहासात दुसऱ्या बाजीरावाची नोंद 'पळपुटा बाजीराव' अशी झाली होती. सिंधुदुर्गाचा राजकीय इतिहास लिहिला जाईल तेव्हा राणे बंधुंची नोंद 'पळपुटे राणे' अशीच केली जाईल.

First published:

Tags: Narayan rane, Nilesh rane, Nitesh rane, Shivsena