जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सरकारवर समाजाचा दबाव असेल तर.., मोहन भागवतांचं मोठं विधान

सरकारवर समाजाचा दबाव असेल तर.., मोहन भागवतांचं मोठं विधान

हिंदू हे मुसलमानाच्या विरोधात नाही. रोज मंदिरांचा मुद्दा काढणे योग्य नाही,

हिंदू हे मुसलमानाच्या विरोधात नाही. रोज मंदिरांचा मुद्दा काढणे योग्य नाही,

‘सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता व ‘रकार’ म्हणजे सरकार असेपर्यंत सरकार करेल, मात्र समाज एकत्र असेल

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 28 एप्रिल :  सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता व ‘रकार’ म्हणजे सरकार असेपर्यंत सरकार करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतं मग ते सरकार कोणतेही असो सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तेच तोपर्यंत सरकार राहू  शकते’ असं परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं. अमरावती (amravati) येथे भानखेडा स्थित संत कंवर धामरमध्ये गद्दीनशिणी समारोह समारंभ पार पडला. यावेळी मोहन भागवत यांनी आपले परखड मत मांडले. ‘मी संघाचा सरसंघचालक आहे, मी सरकारमध्ये जात नाही, सरकारने एकच गोष्टी माझ्यावर थोपवली ती म्हणजे सरकारने दिलेली सिक्युरिटी. परंतु जेव्हा मी समाजात जातो आणि काही लोक मला काही मागणी करतात तेव्हा मी ते सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.  सिंधी बांधवांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सिंधी विद्यापीठाची मागणी केली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. ( जन्मदात्या आईने फक्त 80 हजारांसाठी लेकीला विकलं, मुलीसोबत घडलं भयंकर ) ‘सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता व ‘रकार’ म्हणजे सरकार असेपर्यंत सरकार करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतं मग ते सरकार कोणतेही असो सरकारला समाजाच्यासोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तेच तोपर्यंत सरकार राहू  शकते असे.संपुर्ण समाजाने एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. संपूर्ण समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडागर्दी निर्माण होऊ शकते. वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगलं बनावं, असं मतही  मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ( उमरान मलिकच्या वेगानं काँग्रेसचे दिग्गज नेते चकित, BCCI कडे केली खास मागणी ) तसंच, धर्मपीठावर बसने हे औचित्य भंग आहे, धर्मा पिठावर कुणाचे पीठाधीपती म्हणून नियुक्ती होत असताना त्या ठिकाणी माझे काम नाही, मंदिराच्या आत आमचं काही काम नसून,आम्ही लोक मंदिराच्या बाहेर दंडा घेऊन रखवाली करण्याचा आमचं काम आहे. मंदिराच्या आतमधील गोष्टी आमच्या मर्यादेत नाही, असंही मोहन भागवत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात