Home /News /maharashtra /

Mumbai News: वीकएण्ड पार्टीचा प्लॅन करत असलात तर सावधान! मुंबईच्या महापौरांचे कडक आदेश

Mumbai News: वीकएण्ड पार्टीचा प्लॅन करत असलात तर सावधान! मुंबईच्या महापौरांचे कडक आदेश

Demo Pic

Demo Pic

वीकएण्ड पार्टीचा प्लॅन करत असलात तर सावधान! नियमांचं उल्लंघन करून गर्दी झालेली दिसल्यास पब मालकावर करवाई होईलच, पण ग्राहकांनाही तुरुंगात डांबायचे आदेश दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी News18lokmat ला दिली आहे.

मुंबई, 5 मार्च: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे (Coronavirus latest updates Mumbai)राज्य सरकारने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. काही अटी आणि शर्तींच्या आधारे रात्री उशिरापर्यंत हॉटेल रेस्टॉरंट सुरू ठेवायला परवानगी जरी दिसली दिली असली तरीही व मालकांकडून या नियमांना थेट हरताळ फासला गेल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे आता बार किंवा पब मालकांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. नुसते पबमालकांवरच नाही, तर पबमध्ये गर्दी करणाऱ्या ग्राहकांवरही कलम 188 अंतर्गत कारवाई करा, असे आदेश दिल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी News18 lokmat ला दिली आहे. त्यामुळे वीकएण्डला पार्टीचा प्लॅन करत असाल तर जरा जपून. गेल्या आठवड्यात वरळीतल्या पबमध्ये सुरू असलेल्या धिंगाण्याचा पर्दाफाश मनसैनिकांनी केला होता. वरळीतल्या ज्या भागात हे पब सुरू होते तो भाग पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे पबमधल्या स्टिंग ऑपरेशन नंतर सरकारवर प्रचंड टीका झाली होती. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी पब मध्ये गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. पब मालकांवर MRTP ची कारवाई करा, असे आदेश दिल्याचं महापौरांनी सांगितलं. त्याबरोबर साथीच्या काळातल्या जमावबंदीच्या आदेशाचं (कलम 188)उल्लंघन केलं तर ग्राहकांवरही कारवाई होऊ शकते. वरळीतल्या कमला मिल कंपाउंड आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक डिस्कोथेक आणि पब्स् आहेत. या ठिकाणी तरुणाई बेधुंद होत पार्ट्या करत असते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणाईकडून कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असतं. त्यामुळे तरुणाईच्या या बेधुंद पार्ट्या कोरोनाला निमंत्रण देणाऱ्याच ठरतात. मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या स्टाफमधील 10 जण पॉझिटिव्ह, कोरोनाचं संकट वाढलं गेल्या वर्षी कोरोना संकटात वरळी कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वरळीवर परत अशी वेळ येऊ नये आणि पब मालकांना आपण कोणताही राजाश्रय देत नाही हे दाखवून देण्यासाठी पबमालकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यांच्यावर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. मात्र गर्दीसाठी फक्त मालकांनाच जबाबदार न धरता त्या पबमध्ये गर्दी करणाऱ्या ग्राहकांवरही कारवाई कारवाईचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. पबमध्ये गर्दी करणाऱ्यांवर पँडेमिक अॅक्ट 188 नुसार कारवाई करण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतल्या प्रसिद्ध फाइव्हस्टार हॉटेलमध्ये झुरळं! फ्रीजमध्ये मुदत संपलेले पदार्थ जर महापालिका प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता महापौरांचे आदेश पाळायचे ठरवले तर धांगडधिंगा करत ओला वीकेण्ड साजरा करणाऱ्यांच्या स्वप्नावर नक्कीच पाणी पडू शकतं. अतिउत्साही तरुणांना आपली सॅटर्डे नाईट तुरुंगात काढावी लागू शकते. त्यामुळे सावधान.
First published:

Tags: Kishori pedanekar, Mumbai Mayor, Mumbai Pub

पुढील बातम्या