CoronaVirus: मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या स्टाफमधील 10 जण आढळले पॉझिटिव्ह

CoronaVirus: मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या स्टाफमधील 10 जण आढळले पॉझिटिव्ह

मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या स्टाफमधील (Restaurant Staff Test Positive For Corona ) १० जणांना कोरोनाची लागण (Corona Positive)झाल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर हे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई 05 मार्च : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अशा स्थितीतही योग्य खबरदारी घेतली जात नसल्यानं प्रसार आणखीच झपाट्यानं वाढू लागला आहे. आता मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंट स्टाफमधील (Restaurant Staff Test Positive For Corona ) १० जणांना कोरोनाची लागण (Corona Positive)झाल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर हे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. मात्र, तोपर्यंत या स्टाफच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण (Corona Infection) होण्याचा धोका वाढला आहे.

मुंबई महापालिकेनं सांगितलं, की अंधेरीमधील राधाकृष्ण रेस्टॉरंटच्या स्टाफमधील १० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्टाफमधील इतके कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर राधाकृष्ण रेस्टॉरंट २ दिवसांसाठी बंद केले आहे. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी काम करतात. बीएमसीनं म्हटलं आहे, की संपूर्ण रेस्टॉरंटचं सॅनिटायझेशन आणि नवीन कर्मचारी घेतल्यानंतरच रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

कोरोना संक्रमित आढळलेल्या स्टाफमधील १० जणांना बीकेसी जंबो सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. सोबतच त्यांच्या संपर्कात आललेल्या इतरांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवीन 8,998 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 21,88,183 इतकी आहे. राज्यात गुरूवारी 60 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 52,340 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्येत काही प्रमाणात घट आली आहे. मात्र, मृतांची संख्या अधिक आहे.

गुरुवारी दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 1,104 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 3,29,846 वर पोहोचली आहे. गुरुवारी याठिकाणी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे, यानंतर मृतांचा एकूण आकडा 11,492 वर पोहोचला आहे.

Published by: Kiran Pharate
First published: March 5, 2021, 1:41 PM IST

ताज्या बातम्या