मुंबईतल्या प्रसिद्ध फाइव्हस्टार हॉटेलमध्ये झुरळं! फ्रीजमध्ये दिसले मुदत संपलेले अन्नपदार्थ

मुंबईतल्या प्रसिद्ध फाइव्हस्टार हॉटेलमध्ये झुरळं! फ्रीजमध्ये दिसले मुदत संपलेले अन्नपदार्थ

धक्कादायक! FDA ने केलेल्या तपासणीत या हॉटेलमध्ये चीज, ज्यूस इडलीचं पीठ, फळांचा गर, फ्रूट प्यूरी असे पदार्थ फ्रीजमध्ये होते, पण त्यावरची वापरायची मुदत उलटून गेलेली दिसली.

  • Share this:

मुंबई, 4 मार्च: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील जगप्रसिद्ध अशा एका पंचतारांकित हाॅटेलवर कारवाई (FDA raids Mumbai five star hotel) केली. हे हाॅटेल इतकं मोठं आणि प्रतिष्ठित मानलं जातं की, अशा हॉटेलमध्ये शिळं अन्न, झुरळं असले प्रकार दिसतील, असं कुणालाही खरं वाटणार नाही. पण एका ग्राहकाच्या तक्रारीवरून FDA ने या हॉटेलची तपासणी केली आणि धक्कादायक वास्तव समोर दिसलं.

FDA च्या तपासणीमध्ये हाॅटेलमधील अन्नपदार्थ साठविण्याच्या काही फ्रीजवरील तापमान निदर्शक यंत्रणा बंद पडलेलली किंवा नसलेली आढळली. या हॉटेलमध्ये चीज, ज्यूस इडलीचं पीठ, फळांचा गर, फ्रूट प्यूरी असे पदार्थ फ्रीजमध्ये होते, पण त्यावरची वापरायची मुदत उलटून गेलेली दिसली.

मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळून आले. मुख्य किचनमधील अन्नपदार्थ साठवण्याच्या कक्षात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आला. हे स्टोरेज झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत बंद करण्याचे तत्काळ निर्देश देण्यात आले आहेत. मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा तात्काळ नष्ट करण्यात आला आणि पुढील कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत करण्यात आली.

अशा पद्धतीने इतक्या मोठ्या आणि नावाजलेल्या पंचताराकित हाॅटेलमध्ये मुदत संपलेले अन्न पदार्थ ग्राहकांना बनवून दिले जात होते तसंच हाॅटेलच्या किचनमध्ये झुरळांचं साम्राज्य म्हणजे ग्राहकांची सुरक्षा वेशीला टांगलेली दिसली.  एवढे पैसे खर्च करूनही नागरिकांकरता अशा हाॅटेलचं खाणं नक्कीच धोक्याचं असेल. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने याआधी देखील अशा अनेक मोठ्या पंचतारांकित हाॅटेल्सवर कारवाई केली आहे. मात्र तरी देखील ही पंचतारांकित हाॅटेल ग्राहकांच्या जीवाशी खेळत असतील तर अशा फाइव्ह स्टार्सवर मोठी कारवाई होणं अपेक्षित आहे.

ही कारवाई पंचतारांकित तसेच तत्सम हॉटेलांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी.एम.कदम, अन्न सुरक्षा अधिकारी यो.सु.कणसे आणि एम.एन.चौधरी, सहायक आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांनी शशिकांत केकरे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांच्या आदेशाने करण्यात आली.

First published: March 4, 2021, 10:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या