मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai : IAS अधिकाऱ्यानं एकलव्यासारखी केली चित्रकलेची साधना, पाहा Video

Mumbai : IAS अधिकाऱ्यानं एकलव्यासारखी केली चित्रकलेची साधना, पाहा Video

X
प्रशासकीय

प्रशासकीय अधिकारी म्हणून कराव्या लागणाऱ्या सर्व धावपळीतही मुंबईतील आयएएस अधिकारी वंदना कृष्णा यांनी त्यांच्यातील कला आणि कलाकार जिवंत ठेवला आहे.

प्रशासकीय अधिकारी म्हणून कराव्या लागणाऱ्या सर्व धावपळीतही मुंबईतील आयएएस अधिकारी वंदना कृष्णा यांनी त्यांच्यातील कला आणि कलाकार जिवंत ठेवला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 डिसेंबर :  आयएएस अधिकारी होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील खडतर स्पर्धेत सर्वोत्तम यश मिळवणे आवश्यक असतं. ही परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास, मेहनत, एकग्रता यासारख्या अनेक गोष्टींची गरज असते. या सर्व गोष्टी जमवून आयएएस झाल्यानंतर स्वप्न पूर्ण झालं असं वाटत असलं तरी ती प्रत्यक्ष सुरुवात असते. प्रशासकी जबाबदारी सांभाळत असताना रोज धावपळ करावी लागते. दिवसाचे 24 तासही पुरत नाहीत. या सर्व धावपळीतही मुंबईतील आयएएस अधिकारी वंदना कृष्णा यांनी त्यांच्यातील कला आणि कलाकार जिवंत ठेवला आहे.

एकलव्याशी नातं

वंदना कृष्णा यांचं नातं थेट एकलव्यासोबत आहे. एकलव्य स्वयंप्रेरणेतून धनुर्विद्येची कला शिकला. तोच मार्ग वंदना कृष्णा यांनी चित्रकलेच्या बाबतीत स्वीकारला.  शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असतांना त्यांनी चित्रकलेचा रियाझ अखंड सुरू ठेवला आहे. त्यांनी आपल्या कलेला वाव देत अनेक चित्र रेखाटले. 'फ्लाईट ऑफ फॅन्टसी' हे सुंदर शिर्षक वंदना कृष्णा यांनी आपल्या चित्रांना दिले आहे. यावरूनच त्यांच्या चित्र प्रतिभेची ओळख होते. स्वाभाविकता आणि सहजता हे त्यांच्या चित्रातले गुण वैशिष्ट्ये वाटतात. गाव असो वा शहर तिथल्या दृष्यकाव्याला रंगभाषेतून साकारण्याचे आव्हान वंदना कृष्णा यांनी सहजतेने स्वीकारलेले दिसते.

पोलीस अधिकाऱ्याचा मित्र बनला कॅमेरा, क्लिक झाली भन्नाट चित्रं! पाहा Video

तीन दशकांपेक्षा जास्त काळ शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवपदी काम करताना त्यांना आवड जोपासता आली नाही. परंतु वेळ मिळेल तेव्हा त्यांनी चित्र काढण्यात रस ठेवला. निवृत्तीनंतर एखादा व्यक्ती आपल्या गावी अन्यथा इच्छित स्थळी जाऊन आराम करण्याची भावना व्यक्त करीत असतो. परंतु वंदना कृष्णा यांनी आपली आवड जोपासत कॅनव्हासवर रंगांची उधळण केली आणि त्यांच्या कल्पनेतून अनेक चित्रे रेखाटली.

आपल्या चित्रकलेच्या आवडीबद्दल बोलताना कृष्णा म्हणाल्या की, 'आयएएस अधिकारी असल्यामुळे कामातून वेळ मिळत नाही. चित्रं काढायची म्हटली तर एकाग्रता आणि शांतता महत्वाची आहे. त्यांनी काढलेली सर्व चित्रं ही एका विशिष्ट विषयावर आहेत. रस्त्यातून प्रवास करतांना मुंबईतील अनेक गगचुंबी इमारती त्यांना दिसायच्या त्यावर काम करणारे मजूर हे सर्व त्या आपल्या डोळ्यात टिपून  वेळ मिळाल्यावर ते कल्पना शक्तीच्या जोरावर कॅनवासवर रंगवत असे.

Highlining : तारेवरची कसरत करणारा मराठी तरूण, Video पाहून चुकेल काळजाचा ठोका!

मला पावसाळा हा ऋतू सर्वात प्रिय आहे. कारण या ऋतू मध्ये आपल्याला सर्व रंग छटा पाहायला मिळतात, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. कृष्णा यांना त्यांनी रेखाटलेल्या चित्रांच इंटरनॅशनल प्रदर्शन भरविण्याची इच्छा आहे.

First published:

Tags: Local18, Mumbai