जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Highlining : तारेवरची कसरत करणारा मराठी तरूण, Video पाहून चुकेल काळजाचा ठोका!

Highlining : तारेवरची कसरत करणारा मराठी तरूण, Video पाहून चुकेल काळजाचा ठोका!

Highlining : तारेवरची कसरत करणारा मराठी तरूण, Video पाहून चुकेल काळजाचा ठोका!

अक्षय सरोदे हा मराठी तरूण गेल्या काही वर्षांपासून हायलायनिंग करतो. त्याचा हा साहसी प्रकार पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 नोव्हेंबर : आपण सर्वांनी डोबांरीचा खेळ पाहिला असेल. या खेळात दोन टोकांना बांधलेल्या अतिशय पातळ दोरीवर तोल सावरून लहान मुलं चालतात. डोंबारीच्या खेळासारखंच पण दोन डोंगराच्या आत, दोन इमारतींच्यामध्ये किंवा उंचावर दोन ठिकाणांच्या टोकांना दोरी बांधून त्यावर स्वत:चा तोल सांभाळून चालण्याच्या साहसी खेळाला हायलायनिंग म्हणतात. मुंबईचा अक्षय सरोदे हा मराठी तरूण हायलायनिंग करत आहे. त्याचा हा साहसी प्रकार पाहून तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. हायलायनिंगमध्ये टीमवर्क हे अत्यंत महत्त्वाचे असते. अक्षयसोबत हर्षदीप पवार आणि आदर्श भट यांची टीम आहे. ही टीम एकत्रपणे कोणतेही टास्क पूर्ण करते. टीममधील प्रत्येकाचाच  टास्क पूर्ण करण्यात महत्त्वाचा वाटा असतो. कसा केला सराव? अक्षय गेल्या 4-5 वर्षांपासून हायलायनिंग करत आहे.  त्यानं आजवर  25 मीटरपासून 200 मीटर लांब हायलायनिंगवर चालण्याचा सराव केला आहे. तो सह्याद्रीच्या पर्वतरांगातील अनेक डोंगर दऱ्यांमध्ये दोरी लावून, हायलाईन सेट करुन चालला आहे. हायलायनिंग करताना 1 इंच रुंदी असलेल्या दोरीवर चालायचे असते. त्याचबरोबर हे करताना सुरक्षेची सर्व खबरदारी घेणे तसंच सेफ्टी किट सोबत असणे आवश्यक आहे. Video : हॉलिवूड थक्क होईल असे स्टंट करणारा मराठी तरूण, सैन्यालाही करतो मदत एकोले व्हॅली, देवकुंड धबधबा, सांधन व्हॅली, घुटके व्हॅली, सुरु व्हॅली ( लडाख ), लेह सिटी, देवप्रयाग (उत्तराखंड), दार्जिलिंग या प्रमुख ठिकाणी अक्षयनं आजवर हायलायनिंग केलं आहे. यावर्षी दिल्लीतील  लाल किल्ल्यावर झालेल्या ‘वॉक ऑफ करेज’ या कार्यक्रमातही त्याला हे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. तो वेगवेगळ्या ब्रँडच्या प्रमोशनसाठीही प्रात्याक्षिक करतो.

    News18

    मुंबईमध्ये जुहूमधील पुष्पा पार्कमध्ये तो सध्या स्लॅकलाईनचा सराव करत आहे. भारतात ‘ब्लाइंड फोल्ड वॉल्क ऑन हायलाईन’ हा प्रकार रुबीक रूबीक क्यूब हायलाइनिंग करत सोडवणारा अक्षय हा पहिला भारतीय आहे. आठव्या वर्षीच एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करणाऱ्या गृहिताच्या यशाचं रहस्य काय? Video ‘मी आणि माझी टीम हायलायनिंग खेळाचे प्रात्यक्षिक टीव्ही शोसाठी सुद्धा करतो. यावर्षी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या टीव्ही शोमध्ये माझा मित्र हर्षदीप पवारनं प्रात्याक्षिक केले आहे. हा प्रकार करण्यासाठी धाडस आवश्यक आहे. त्याचबरोबर सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही देखील सुरक्षेची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच हायलायनिंग करतो,’ असे अक्षयने सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , mumbai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात