मुंबई, 03 डिसेंबर : सिंहस्थ कुंभमेळा असो की, पंढरपूरची वारी अथवा गुर ता गद्दी सोहळा. प्रत्येक वेळी सणसोहळे आणि सांस्कृतिक उत्सवाच्या व्यवस्था सांभाळताना आपल्या कॅमेऱ्यातून भारतीय संस्कृतीचे रंग टिपणारे राज्याचे सहपोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या छायाचित्र संग्रहातील काही निवडक छायाचित्रांचे कल्चरल यात्रा प्रदर्शन मुंबई तील जहांगीर कला दालनात भरवण्यात आले आहे. हे कल्चरल यात्रा प्रदर्शन 5 डिसेंबर पर्यंत जहांगीर कला दालन येथे सुरु असणार आहे. कल्चरल यात्रेत काय आहे? डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात गेल्या 25 वर्षांतुन 2 वेळेस बंदोबस्त पाहिला आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यात पोलिस दलाचे जिल्हा पोलिस प्रमुख, पोलिस आयुक्त या नात्याने नेतृत्व केले. तसेच दक्षिण मध्य सांस्कृतिक विभागाचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले. गुरू ग्रंथसाहेब त्रिशतक महोत्सवानिमित्त आयोजित गुर ता गद्दी सोहळ्याच्या वेळी ते पोलिस प्रमुख होते. भारतीय सांस्कृतिक विभागाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चंडीगड येथे आयोजित माटी के रंग या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाचे प्रमुखपद त्यांनी भूषविले. त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज यात्रा,खजुराहो नृत्य महोत्सव यावेळी त्यांच्या सोबतीला नेहमी कॅमेरा होता. याच कॅमेराच्या माध्यमातून त्यांनी विविध क्षण चित्रित केले ज्यांमधून संस्कृतीच दर्शन घडेल, लुप्त होत चाललेल्या यात्रा, उत्सव यामाध्यमातून पुढच्या पिढीकडे सोपवता येतील. म्हणून नृत्य, यात्रा,पंढरपूरची वारी, खाद्यपदार्थ, सिंगल यांचं गाव, प्रथा - परंपरा त्यांनी छायाचित्रातून टिपल्या आहेत.
BASE Jumping : हवेत तरंगणारा मुंबईकर तुम्हाला माहिती आहे? पाहा Video
माझ्या ज्या गावातून माझे वडील पोलीस अधिकारी झाले. तसंच माझ्या गावाची संस्कृती, कला सुद्धा टिपण्याचा मी प्रयत्न केला आहे. या सर्व गोष्टींच डॉक्युमेंटेशन होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, असं डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितले. किती छायाचित्र लावण्यात आली आहेत? 100 ते 125 छायाचित्र या कल्चरल यात्रा मध्ये पाहता येणार आहेत. सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या कल्चरल यात्रेला छायाचित्र प्रेमीना भेट देता येणार आहे.
कुठे आहे कल्चरल यात्रा प्रदर्शन? जहांगीर कला दालन मुंबई