जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / शरद पवारांच्या 'त्या' मोठ्या निर्णयावर खुलासा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा श्वास

शरद पवारांच्या 'त्या' मोठ्या निर्णयावर खुलासा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा श्वास

शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली पण...

शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली पण...

शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली पण…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जुलै : शिवसेनेमध्ये भूकंप सत्र सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय महाराष्ट्राला लागू नसणार आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांचं पत्र समोर आलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली आहे. मात्र, पटेल यांनी ट्वीट करून स्पष्ट केलं आहे, महाराष्ट्र वगळून संपूर्ण देशासाठी हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात

आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने, सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि सेल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस वगळून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची भूमिका तात्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आली आहे. मात्र हा निर्णय महाराष्ट्रासाठी लागू नसणार आहे, असा खुलासा पटेल यांनी केला. विशेष म्हणजे, एकीकडे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत केलेल्या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आमदारांनंतर शिवसेनेच्या खासदारांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेच्या आमदारांसोबतच खासदारांनीही या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त आमदार आणि खासदारच नाही तर शिवसेनेचे पदाधिकारीही जात आहेत. अशातच सर्व विभाग बंद करण्याचा आदेश आल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली होती. पण आता त्यावर पटेल यांनी खुलासा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात