मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर...भाजपचं टेन्शन वाढवणारा सर्व्हे!

महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर...भाजपचं टेन्शन वाढवणारा सर्व्हे!

लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तर महाविकासआघाडीला मोठा फायदा होईल, असा सर्व्हे समोर आला आहे.

लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तर महाविकासआघाडीला मोठा फायदा होईल, असा सर्व्हे समोर आला आहे.

लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तर महाविकासआघाडीला मोठा फायदा होईल, असा सर्व्हे समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 26 जानेवारी : शिवसेनेत झालेल्या भूकंपानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं अन् महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आगामी निवडणुका महाविकासआघाडी म्हणूनच लढण्यासाठी आग्रही आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकासआघाडी एकत्र लढली तर महाराष्ट्रात भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. इंडिया टुडे आणि सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेचे हे आकडे भाजप नेत्यांची झोप उडवू शकतात.

या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात.

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात एनडीएला (भाजप, शिंदे गट, आरपीआय) फक्त 14 जागा मिळतील, तर युपीएला तब्बल 34 जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्रात भाजपचंच सरकार

महाराष्ट्रामध्ये भाजपला एवढा मोठा फटका बसेल असा अंदाज या सर्व्हेमध्ये व्यक्त केला गेला असला तरी केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकारच येईल, असं हा सर्वे सांगतो. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा 10-12 जास्त जागा म्हणजेच 284 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएला 298 आणि युपीएला 153 जागा मिळतील, असंही हा सर्व्हे सांगतो.

लोकसभेच्या निवडणुकांना आता दीड वर्षांपेक्षा कमी काळ शिल्लक आहे. मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये देशभरात लोकसभा निवडणुका होतील, असा अंदाज आहे. याआधी 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा देशाच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला बहुमत मिळवून दिलं. आता नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक साधणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: BJP, Congress, NCP, Shivsena