Home /News /maharashtra /

लॉकडाऊन आणखी किती दिवस? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे सरकारला सवाल

लॉकडाऊन आणखी किती दिवस? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे सरकारला सवाल

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा आता सरकारला विचार करावा लागणार आहे.

पनवेल, 4 जुलै: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा आता सरकारला विचार करावा लागणार आहे. अन्यथा नागरिकांना आणखी मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावं लागणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता आणखी किती दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असा सवाल विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे. सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक कार्यपद्धती ठरवायला हवी, असंही फडणवीस यांनी सांगितलं. हेही वाचा..अक्षयकुमारचा 'तो' नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात, भुजबळ यांनी दिले चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीस आज पनवेल आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना फडणवील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पनवेलमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जिल्हा उपरुग्णालयाची क्षमता आता संपली आहे.  पनवेलचा कोरोना संक्रमणचा दर 45 टक्के होता आणि त्याच वेळी देशाचा संक्रमनाचा दर 6.4 टक्के होता. त्यामुळे येथे टेस्टिंग वाढवण्याची आवश्यकता आहे. महापालिकाची आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी आरोग्य विभाग आणि  वैदकीय शिक्षण विभागला पुढाकार घ्यावा लागणार आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. महापालिकांना नया पैशाची मदत नाही... राज्य सरकारकडून महापालिकांना कोविड-19 करीता एका नया पैशाची मदत करण्यात आली नाही, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. आरोग्य व्यवस्था जरी सरकारची जबाबदारी असेल तरी महापालिकांवर बोजा आहे. काही मोठ्या महापालिका सोडल्या तर अनेक महापालिकाची कोविड-19 चा सामना करण्याची क्षमता नाही. राज्य  सरकार आणि महापालिकांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. 2 किलोमीटरची अट व्यावहारिकच नव्हती... एका छोट्याशा गावासाठी ठीक आहे. पण मुंबई आणि पुणे सारख्या शहरासाठी छोट्या-छोट्या गोष्टीसाठी सुद्धा 2 किलोमीटरसाठी सहज जावा लागतं. अनलॉकच्या काळात लोकांना कामासाठी बाहेर जावं लागत आहे. ती अट कुठून आली मला माहीत नाही, पण रद्द झाली ते योग्य झालं, असं फडणवीस म्हणाले. हेही वाचा..कोरोनाबाबत WHOने घेतला यू-टर्न, सगळ्यांसमोर केली चीनची पोलखोल पोलिस आणि नागरिक संघर्ष... लॉकडाऊनमुळे पोलिसांवर ही विनाकारण भार वाढत आहे. पोलिस आणि नागरिकांमध्ये संघर्ष उभं राहणार नाही, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. आताच्या परिस्थितीत लोकांना कोरोनाचा धोका समजलेला आहे. पण अनेक नागरिक आवश्यक कामासाठी बाहेर पडतात. गेल्या चार महिन्यांत पोलिस अत्यंत थकलेले आहेत. आपला जीव धोक्यात टाकून पोलिस कर्तव्य बजावत. पोलिस कोविडने मृत्यू झाले एका अर्थाने ते शहीद झाले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Devendra Fadanvis

पुढील बातम्या