मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईतील सर्वात मोठ्या तुरुंगात कसा झाला कोरोनाचा शिरकाव? गृहमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबईतील सर्वात मोठ्या तुरुंगात कसा झाला कोरोनाचा शिरकाव? गृहमंत्र्यांनी केला खुलासा

तुरुंगात बाहेरील नागरिकांना येण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत आर्थर रोड तुरुंगात 77 कैद्यांसह 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तुरुंगात बाहेरील नागरिकांना येण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत आर्थर रोड तुरुंगात 77 कैद्यांसह 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तुरुंगात बाहेरील नागरिकांना येण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत आर्थर रोड तुरुंगात 77 कैद्यांसह 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई, 8 मे : येथील आर्थर रोड तुरुंगात 77 कैद्यांसह 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. तुरुंगात बाहेरील नागरिकांना प्रवेश नाही. अशा परिस्थितीत येथील इतक्या कैद्यांना कोरोनाची लागण कशी झाली, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे.

सध्या आर्थर रोडच्या तुरुंगातसह 8 तुरुंगांमध्ये कडक लॉकडाऊन लागू केला आहे. कोणालाही तुरुंगात जाण्याची परवानगी नसताना येथे कोरोनाचा रुग्ण कसा आढळला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर अनिल देशमुख म्हणाले की, भाजी किंवा दूध पोहोचविणाऱ्यांकडून तुरुंगात कोरोनाचा संसर्ग झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते

राज्यात कोरोना (Covid -19) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 1362 नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहे. आता येथे रुग्णांची एकूण रुग्णांची संख्या 18,120 इतकी झाली आहे.

काल आलेल्या माहितीनुसार मुंबईच्या (Mumbai) आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगातील 72 कैदी आणि 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 72 कैद्यांना जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे सांगितले गेले होते. येथील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांनाही सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे तुरुंग प्रशासनाने काल सांगितले होते. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंता वाढवणारी आहे. अशात वैद्यकीय विभागातही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता तुरुंगातही कोरोना पसरल्याने भीती वाढली आहे.

संबंधित -कोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना

मध्यरात्री उठून 500 मुस्लीम कैद्यांसाठी न्याहरी तयार करतात हिंदू बांधव

First published:

Tags: Anil deshmukh