मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Khadse vs Mahajan: मास्तराच्या मुलाची 1200 कोटींची मालमत्ता कशी? खडसेंच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले...

Khadse vs Mahajan: मास्तराच्या मुलाची 1200 कोटींची मालमत्ता कशी? खडसेंच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले...

मास्तराच्या मुलाची 1200 कोटींची मालमत्ता कशी? खडसेंच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले...

मास्तराच्या मुलाची 1200 कोटींची मालमत्ता कशी? खडसेंच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले...

Eknath Khadse vs Girish Mahajan: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जळगाव, 2 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. माझ्या मालमत्तांची चौकशी अनेकदा झाली पण मास्तराच्या मुलाकडे बाराशे कोटींची मामत्ता कुठून आली असा सवाल खडसेंनी उपस्थित केला होता. त्यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे करत असलेले आरोप हा केविलवाणा प्रकार आहे. त्यांचं कुणी ऐकत नसल्याने ते वेड लागल्यासारखे वागत आहेत. एकनाथ खडसेंनी लेव्हल सोडली, खडसेंच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हे दाखल झाले. माझी चौकशी करावी. माझे वडील शिक्षक होते हे खरं आहे. पण एकनाथ खडसे यांच्या नावावर एवढे उतारे आले कुठून? खडसेंनी शेती करून 100 उतारे कसे ? एकनाथ खडसेंनी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे. खडसेंचा जावई जेलमध्ये असल्याने मंदा ताईंना समन्स, या सर्वांमुळे लक्ष विचलित करण्यासाठी वाटेल तसे आरोप करायचे. माझा सल्ला आहे की, त्यांनी ईडीला सामोरे जावे. भोसरी भूखंड प्रकरणावरुन त्यांना मंत्रिपदावरून काढले. खडसेंना मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला पाहिजे असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं. Chhagan Bhujbal आणि Suhas Kande यांच्यातील वाद मिटला नाही तर... ? जयंत पाटलांनी म्हटलं.... नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे? बीएचआर घोटाळ्याच्या संदर्भात मी पाठपुरावा केला आणि त्यामुळे काहींनी माझ्यामागे ईडीचा ससेमिरा लावला. माझ्याकडच्या मालमत्तांची चौकशी झाली. ही सर्व संपत्ती माझ्या वडिलोपार्जित आहे. मात्र, मास्तराचा मुलगा असलेल्याकडे 1200 कोटींची संपत्ती कशी आली? ही संपत्ती कशी जमवली त्याची चौकशी का होत नाही? असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. 'एखादा शूटर लावून मला मारून टाका' सेनेच्या आमदाराची थेट खडसेंकडे मागणी जळगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे 'एखादा शूटर लावून मला मारून टाका' अशी मागणीच पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला. 'व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत एकनाथ खडसे हे माझे नाव जोडत असून खडसेंनी ही क्लिप मतदारसंघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी. जेणेकरून कोणाची काय पात्रता आहे हे मतदारांना कळेल. मी व माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे, माझी छोटे कुटुंब असून माझा बाजूने कोणी बोलणारेही नाही , आजही मी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावून राहतो ही स्थिती आहे' असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Eknath khadse, Girish mahajan, Jalgaon

पुढील बातम्या