विरार, 18 मार्च : होळी (Holi) आणि धुळवडीचा (Dhulvad / Dhulivandan) सर्वत्र आनंद साजरा केला जात असतानाच रंगाचा बेरंग करणारं वृत्त विरारमधून समोर आलं आहे. विरार (Virar) पश्चिमेकडील आगाशी येथे बाईकस्वाराला फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकलचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सायकलस्वार जागीच ठार (bicycle rider died) झाला आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी संबंधित बाईकस्वाराला ताब्यात घेतले आहे. (water balloon thrown on biker after accident bicycle rider in Virar) फुगे मारण्यावर बंदी असतानाही होळीच्यादिवशी अनेकजण रस्त्यावर जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावे लागत आहे. अशीच एका घटना गुरुवारी आगाशी चाळपेठ परिसरात घडली आहे. बूटपॉलिशचे दुकान बंद करून होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी निघालेल्या रामचंद्र हरिनाथ पटेल यांना आपला जीव गमवावा लागला आहे. रामचंद्र सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास विरारवरून चाळपेठच्या दिशेने जात असताना, शेजारून होळी आणण्यासाठी गेलेल्या एका गाडीतून काही मुले फुगे मारत होते. वाचा : बीडमध्ये धुलीवंदनाची अनोखी परंपरा, जावयाला चपलाचा हार घालत गाढवावर मिरवणूक यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने बाईकवरुन येणाऱ्या मुलांना लागला. अचानक फुगा लागल्याने बाईकस्वारांचं गाडीवरुन संतुलन बिघडलं. त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि सायकलवरील रामचंद्र यांना जावून ते धडकले. यात रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन बाईकस्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदरचे बाईकस्वार हे अर्नाळा गावातील तरुण आहेत. यासंदर्भात माहिती देताना अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी फुगा लागल्याने अपघात झाला की नाही या बाबत दुजोरा दिला नाही. पण चौकशी करून अपघाताचे कारण सांगितले जाईल असे त्यांनी सांगितले. धुळवडी संदर्भातील निर्बंध सरकारकडून मागे होळी, रंगपंचमी, धुळवड हे सण स्वतः निर्बंध घालून साजरे करा असा सल्ला राज्य सरकारने नागरिकांना दिला आहे. होळी आणि धुलिवंदन साजरी करण्यास कोणतीही सरकारी हरकत नाही. मात्र,दक्षता पाळून साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या प्रशासकीय नियमांचे पालन आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. होळी, धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.