मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Holi 2022: यंदा होळी, धुळवड साजरी करा धुमधडाक्यात, ठाकरे सरकारकडून निर्बंध मागे

Holi 2022: यंदा होळी, धुळवड साजरी करा धुमधडाक्यात, ठाकरे सरकारकडून निर्बंध मागे

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Holi Rang Panchami Celebration in Maharashtra: महाराष्ट्रात होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले होते. त्या संदर्भात नियमावली जाहीर केली होती. मात्र, आता हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 मार्च : होळी (Holi) आणि धुळवड (Dhulivandan / Rang Panchami) साजरी करण्यावर राज्य सरकारकडून (Maharashtra Government) काही निर्बंध लागू करण्यात आले होते. त्या संदर्भात नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली होती. मात्र, विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता राज्य सराकारने आपले निर्बंध मागे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात यंदा होळी, धुळवड / धुलिवंदन मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

होळी, रंगपंचमी, धुळवड हे सण स्वतः निर्बंध घालून साजरे करा असा सल्ला राज्य सरकारने नागरिकांना दिला आहे. होळी आणि धुलिवंदन साजरी करण्यास कोणतीही सरकारी हरकत नाही. मात्र,दक्षता पाळून साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या प्रशासकीय नियमांचे पालन आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. होळी, धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या नव्या सूचना काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात.

वाचा : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अदिती सारंगधरचं होळीनिमीत्त खास Photoshoot

होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 17 मार्च, 2022 रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा.

18 मार्च 2022 रोजी धुलिवंदन व 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमीत्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

होळी / शिमगा सणा निमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.

वाचा : बीडमध्ये धुलीवंदनाची अनोखी परंपरा, जावयाला चपलाचा हार घालत गाढवावर मिरवणूक

कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

1 मार्च च्या आदेशानुसार मुंबई पुण्यासारख्या 14 शहरांत जर गर्दी 1000 पेक्षा अधिक असेल तर मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची मंजुरी घ्यावी लागेल

भाजपने केली होती टीका

राज्य सरकारकडून होळी आणि धुळवड साजरी करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जोरदार टीका केली होती. भाजपचे नेते राम कदम यांनी म्हटलं होतं, महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का ?  आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत. आहो तुम्ही घाबरट असाल .. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात.

First published:

Tags: महाराष्ट्र, होळी