अजित मांढरे, मुंबई, 19 मार्च : वरळी सी फेस जवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर कारच्या चालकाला ताब्यात घेण्यात आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. कारचा वेग अपघातावेळी १२० किमी प्रतितास इतका होता असे सांगण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या महिलेबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महिला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. तेव्हा तिला भरधाव कारने जोराची धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. महिलेला अपघातानंतर उपचारासाठी नायर हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं.
बागेश्वर बाबांच्या दरबारात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले
कारचा चालकसुद्धा या अपघातात जखमी झाला असून त्याला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कार चालकाची या प्रकरणी चौकशी केली जात आहे. महिलेला चिरडल्यानंतर कारने रस्त्याशेजारी असलेल्या कठड्याला धडक दिली. यामुळे कारच्या समोरील बाजूचं नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident