हिंगोली, 28 फेब्रुवारी : पालकांनी मुलांना शिस्त लावण्यासाठी रागवणे आता महागात पडू शकते. अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात समोर आली आहे. रागावणाऱ्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून चक्क अल्पवयीन मुलाने खून केला आहे. ही धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या सेलू येथे घडली आहे. हा प्रकार लपविण्यासाठी अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, आज (मंगळवार) पहाटेच पोलीसांनी याप्रकरणी चौकशी करत. घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकार उघड केला. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील सेलु या गावात भाऊराव पांडुरग कबले (वय 42) हे कुटुंबियांसह राहतात. भाऊराव व त्यांच्या अल्पवयीन मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला होता. यामध्ये त्यांच्या आईने मध्यस्थी केली होती. त्यानंतर रात्री भाऊराव बाजेवर झोपण्याच्या तयारीत असताना त्यांनी मुलास रागावण्यास सुरवात केली.
रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्…वडिल रागावत असल्याने संतापलेल्या मुलाने हाताच कुऱ्हाड घेऊन बाजेवर असलेल्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केला. यामध्ये भाऊराव यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. घरी पत्नी, तीन मुले असा परिवार असून, उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने कबले दांपत्य रोज मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते.
घडलेल्या प्रकारामुळे कबले कुटुंबीय चांगलेच हादरून गेले. मात्र घडलेल्या प्रकाराची कुठेही चर्चा न करता त्यांनी रात्र जागून काढली… त्यानंतर आज पहाटेच भाऊराव यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. मात्र, या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार तुकाराम आम्ले, बालाजी जोगदंड यांच्या पथकाने सकाळी सहा वाजताच सेलु येथे जाऊन मृत भाऊराव यांचे घर गाठले.
पोलिसांनी पाहताच घरातील मंडळीना घाम फुटला. पोलिसांनी सर्वांचीच चौकशी सुरु केली. त्यामध्ये मुलानेच वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.