अमरावती, 10 सप्टेंबर : संपूर्ण अमरावती जिल्हात (Amaravati district) गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी (Heavy rainfall) सुरू आहे आहे, त्यामुळे अमरावती लगत अऱ्हाड, कुऱ्हाड येथील ब्रिटीशकालीन भिवापूरकर तलावाला तडे (British era Bhivapurkar lake) गेले आहे, त्यामुळे हा तलाव केव्हाही फुटून मोठी जीवीत हानी होऊ शकते अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या भीतीने अऱ्हाड, कुऱ्हाड या गावातील लोक रात्रभर जागे होते. ही माहिती समजताच स्थानिक आमदार रवी राणा यांनी तात्काळ त्या गावांमध्ये जाऊन प्रशासना सोबत संपर्क करून सर्व प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी बोलावले सोबतच एसडीआरफचे पथक व रेस्क्यू टीम रात्री उशिरा गावात दाखल झाली.
या ठिकाणी आमदार रवी राणा, उपविभागीय महसूल अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहणी केली. अऱ्हाड, कुऱ्हाड आणि उतखेड या गावात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तलाव पुटण्याच्या भीतीने तातडीने प्रशासनाने गावात जाऊन पाहणी करत गावातील नागरिकांना इतर ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली अशी माहिती रणजित भोसले, उपविभागीय महसूल अधिकारी अमरावती यांनी दिली.
आमदार रवी राणा यांनी रात्री गावात जाऊन गावच्या नागरिकांशी संवाद साधला तसेच जिल्हा प्रशासनाला तातडीने पावले उचलल्या संबंधी अवगत केले. हा तलाव ब्रिटीशकालीन असून पाटबंधारे विभागाचा असला तरी वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने या तलावाची डागडुजी करण्यासाठी वनविभागाकडून परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
VIDEO: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई? अडसूळांनी म्हटलं....
काल दुपारी या तलावाला तडे दिल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिली त्यानंतर महसूल विभागाचे नायब तहसीलदार बढीये यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पाऊस आल्यास दुर्घटना कुठल्याही क्षणी होऊ शकते असे माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. यामुळे काल रात्रीच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी अऱ्हाड, कुऱ्हाड, उतखेड या तिन्ही गावातील नागरिकांसोबत संवाद साधून सतर्क केले. तर तलाव फुटण्याच्या भीतीने गावकऱ्यांनी रात्र जागून काढली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati