मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर, 2 हजार कोंबड्या गेल्या पुरात वाहून!

भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर, 2 हजार कोंबड्या गेल्या पुरात वाहून!


भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने धुमशान घातले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने धुमशान घातले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने धुमशान घातले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

  • Published by:  sachin Salve
नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 13 ऑगस्ट : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात सापडून 2 हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सालई (बु) -काटेबाम्हणी मार्गावर घडली आहे. यामध्ये पोल्ट्री फार्म मालकाचे लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने धुमशान घातले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.तालुक्यातील अभय राखडे नामक सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे सालई( बु) - काटेबाम्हणी शेतशिवारात चार हजार क्षमतेचे पोल्ट्री फार्म आहे. सदर पोल्ट्री फार्म तुमसरे आईस फॅक्टरी काटेबाम्हणी परिसरात आहे. दरम्यान, परिसरात सततधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण होऊन सालई (बु) येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी शेतशिवारात असलेल्या राखडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरले. (मंत्रीच नसताना 11 हजार 368 कोटी निधी मंजूर आणि खर्च 24 हजार 535 कोटी) त्यामुळे पुराच्या पाण्यात विविध जातीच्या 1500 कोंबड्यासह कोबंड्याचा पशुखाद्य पुरात वाहून गेला. तर 500 कोबड्यांचा पोल्ट्री फार्ममध्येच पुराच्या पाण्याने तडफडून मृत्यू झाला. त्यात अभय राखडे यांचे 2 ते 3 लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आता नुकसान भरपाई मागणी केली आहे. पुराच्या पाण्याने तोंडाचा घास हिसकला दरम्यान, भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीने आलेल्या पुराने अनेकांच्या संसार उद्ध्वस्त केला असून सलग दोन दिवस घरातील अन्नधान्य पाण्यात सापडल्याने अन्न धान्याची वाताहात झाली आहे. सतत पाण्यात राहाल्याने गव्हाला कोंब निघाले आहे. अन्न धान्य झाले खान्यास अयोग्य झाल्याने जनावरांव्यक्तिरिक्त हे धान्य कोण खाईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. (बारावीनंतर करिअर लवकर सुरू करायचंय? 'हे' डिप्लोमा कोर्सेस ठरतील उपयुक्त) भंडारा जिल्हातील मोहाडी शहरात अतीवृष्टीमुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. सामान्यत: प्रत्येक कुटुंब वर्षभर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न धान्य साठवून ठेवतो. मात्र अतिवृष्टीने या साठवून ठेवलेल्या अन्न धान्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तांदूळ,गहू, डाळ रोजच्या उपयोगी वस्तूचे पाण्यामुळे नुकसान झाले आहेत. सतत पाण्यात राहल्याने अन्न धान्याला अक्षरश: कोंब निघाले आहेत. आता हे सडलेले अन्नधान्य मनुष्य खाऊ शकत नसल्याने केवळ जनावराच्या उपयोगी येत आहेत. हा प्रकार एका- दुसऱ्या घरात घडला नसून मोहाडी तुमसर तालुक्यातील 100 च्या वर कुटुंबावर हे संकट आले असून अनेक लोंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. आता मायबाप सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
First published:

पुढील बातम्या