मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Top Diploma Courses : बारावीनंतर करिअर लवकर सुरू करायचंय? 'हे' डिप्लोमा कोर्सेस ठरतील उपयुक्त

Top Diploma Courses : बारावीनंतर करिअर लवकर सुरू करायचंय? 'हे' डिप्लोमा कोर्सेस ठरतील उपयुक्त

बारावीनंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिप्लोमा कोर्स करू शकता. जाणून घ्या बारावीनंतर डिप्लोमा करण्यासाठी हे टॉप 10 डिप्लोमा कोर्सेस उपयुक्त ठरतील.

बारावीनंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिप्लोमा कोर्स करू शकता. जाणून घ्या बारावीनंतर डिप्लोमा करण्यासाठी हे टॉप 10 डिप्लोमा कोर्सेस उपयुक्त ठरतील.

बारावीनंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिप्लोमा कोर्स करू शकता. जाणून घ्या बारावीनंतर डिप्लोमा करण्यासाठी हे टॉप 10 डिप्लोमा कोर्सेस उपयुक्त ठरतील.

मुंबई, 13 ऑगस्ट:  बारावी झाल्यानंतर कित्येक जणांना लवकरात लवकर करिअर सुरू करायचं असतं. मेडिकल, इंजिनीअरिंग किंवा इतर कोणतेही डिग्री कोर्स करायचे झाल्यास तीन ते पाच वर्षांचा कालावधी नक्कीच लागतो. शिवाय या कोर्सेसची फीदेखील कित्येकांना परवडणारी नसते. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत करिअरला सुरुवात करायची असेल, तर डिप्लोमाचा (Diploma after 12th) पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतो. डिप्लोमा कोर्सेस सहा महिने ते दोन वर्षं एवढ्या कालावधीचे असतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिप्लोमा कोर्स करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला डिप्लोमा करता येतो. बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात डिप्लोमा करण्याचे पर्याय आहेत, याबाबत माहिती घेऊ या. डिप्लोमा करून शिक्षक व्हा कित्येकांना टीचिंगची आवड असते. शिक्षक होण्यासाठी डिग्री, नॉलेज अशा गोष्टींना प्राधान्य नक्की दिलं जातं; मात्र शिक्षक होण्यासाठी काही डिप्लोमा कोर्सही मदत करतात. डीएड (D.Ed), एनटीटी (NTT), आणि ईटीई अशा डिप्लोमा कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला प्राथमिक शाळेत नोकरी मिळू शकते. विदेशी भाषा शिका सध्या विदेशी भाषेचं ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना भरपूर मागणी आहे. एखाद्या विदेशी भाषेचा डिप्लोमा करून तुम्ही आरामात ट्रान्सलेटर, मार्केटिंग मॅनेजर किंवा शाळेत त्या भाषेचा शिक्षक म्हणून नोकरी मिळवू शकता. सध्या चिनी, स्पॅनिश, फ्रेंच आणि जपानी भाषांच्या तज्ज्ञांना भरपूर मागणी आहे. हेही वाचा - MPSC Exam Hall ticket 2022: राज्यसेवा परीक्षेचं हॉलतिकीट जारी; 'या' लिंकवरुन करा डाऊनलोड डिझायनिंग फॅशन डिझायनिंग, इंटीरिअर डिझायनिंग, ग्राफिक्स डिझायनिंग किंवा ज्वेलरी डिझायनिंग अशा कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासाठी सहा महिने ते एक वर्षापर्यंतचे डिप्लोमा (Diploma in Designing) कोर्सेस उपलब्ध आहेत. अशा कोर्सनंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता किंवा एखाद्या फर्ममध्ये नोकरी करू शकता. फॅशन डिझायनिंग फॅशन डिझायनिंग (Diploma in Fashion Designing) शिकण्यासाठी फास्ट ट्रॅक डिप्लोमाचा पर्याय उपलब्ध आहे. हा डिप्लोमा केल्यानंतर टेक्स्टाइल डिझायनर, फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट म्हणून करिअर करू शकता. फाइन आर्ट्स दहावी किंवा बारावीनंतर तुम्ही फाइन आर्ट्समध्ये डिप्लोमा (Diploma in Fine arts) करू शकता. क्रिएटिव्हिटी आणि डिझायनिंग क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा चांगला पर्याय असू शकतो. या डिप्लोमानंतर लायजन ऑफिसर, फ्लॅश अ‍ॅनिमेटर किंवा ग्राफिक डिझायनर अशा पदांवर काम करता येतं. हेही वाचा - स्वतःच घडवा स्वतःचं भविष्य; बिकट आर्थिक परिस्थितीवर करा मात; 'हे' पार्ट टाइम जॉब्स ठरतील टर्निंग पॉईंट आर्ट टीचर तुम्हाला कला शिक्षक (Diploma to become Art Teacher) व्हायचं असेल, तर हा डिप्लोमा तुमच्यासाठी आहे. उत्तम चित्रकला किंवा पेंटिंग सर्वांनाच शक्य नसतं; मात्र तुमचा या बाबतीत हातखंडा असेल तर नक्कीच तुम्ही हा डिप्लोमा करून यात करिअर करू शकता. स्टेनोग्राफी सरकारी कार्यालयं आणि कोर्टांमध्ये स्टेनोग्राफरची (Diploma in Stenography) गरज सर्वाधिक भासते. स्टेनोग्राफीच्या कोर्समध्ये टायपिंग कोर्सही करता येतो. साधारणपणे हा कोर्स एका वर्षाचा असतो. हेही वाचा - Career in IT: लाखोंमध्ये पगार आणि जगातील टॉप कंपन्यांमध्ये जॉब हवाय ना? मग हे सर्टिफिकेशन्स कराच कोडिंग सध्या कोडिंग क्षेत्रात भरपूर मागणी वाढली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोडिंगमध्ये रस आहे, त्यांनी बारावीनंतर लगेच एखादा डिप्लोमा (Diploma in Coding) केल्यास एका वर्षात ते कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज करू शकतात. इंजिनीअरिंग दहावी किंवा बारावीनंतर इंजिनीअरिंगसाठी डिप्लोमा (Diploma in Engineering) करता येतो. केमिकल, कम्प्युटर, सिव्हिल, ऑटोमोबाइल आणि मेकॅनिकल अशा फिल्डमध्ये डिप्लोमा करता येतो. कित्येक जण तर इंजिनीअरिंगची डिग्री झाल्यानंतरही स्पेशलायझेशनसाठी डिप्लोमा करतात. अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार हव्या त्या क्षेत्रातला डिप्लोमा करून, तुम्ही बारावीनंतर एक किंवा दोन वर्षांमध्येच आपलं करिअर सुरू करू शकता.
First published:

Tags: Career, Career opportunities

पुढील बातम्या