मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपेंची बैठक; मंकीपॉक्सबद्दल दिली महत्त्वाची अपडेट

जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपेंची बैठक; मंकीपॉक्सबद्दल दिली महत्त्वाची अपडेट

यादरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा त्यांनी समाचार घेतला

यादरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा त्यांनी समाचार घेतला

यादरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा त्यांनी समाचार घेतला

जालना 25 जून : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली. आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून राज्यातील राजकीय वातावरण पाहता सरकार पडल्यास टोपे (Rajesh Tope) यांची ही शेवटची बैठक ठरणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. दरम्यान, जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वार्षिक योजनेंर्तगत गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या विकास कामांसाठी 336 कोटी 21 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्राप्त झालेल्या निधीपैकी जवळपास 98.17 टक्के निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यात आल्याने राजेश टोपेंनी समाधान व्यक्त केलं. सोबतच चालू वर्षातही मंजूर असलेला निधी पूर्णपणे खर्च करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

राज्यातील सर्व पोलीस स्टेशन हाय अलर्टवर, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याची धास्ती

यासोबतच टोपे यांनी मंकीपॉक्सबाबतही महत्त्वाची माहिती दिली. कोरोनासोबतच मंकीपॉक्स आजाराच्या भीतीने राज्यातील नागरिकांच्या मनात धडकी भरवली होती. मात्र, मंकीपॉक्स आजाराचा एक ही रुग्ण महाराष्ट्र राज्यात काय तर संपूर्ण भारत देशात (Monkeypox Cases in India) पण नसल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना केला.

यादरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा त्यांनी समाचार घेतला. टोपे म्हणाले, भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विषयावरून शरद पवार यांच्याबद्दल जे वादग्रस्त ट्विट केलं ते सुसंस्कृत शोभत नाही. महाराष्ट्रातील लोकं अशा भाषेला अजिबात स्वीकारत नाही, म्हणून अशी वक्तव्य कुणीच करू नये, असा खोचक सल्ला टोपे यांनी दिला.

'स्वर्गापासून पाताळापर्यंत शोधा पण 'भगवान'ला हजर करा'; कोर्टाने का दिला असा अजब आदेश?

पुढे टोपे म्हणाले, ग्रामीण भागांमध्ये रोहित्र नादुरुस्त असणं तसंच रोहित्रांसाठी ऑईल नसल्यामुळे अनेक गावांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून हा प्रश्न तात्काळ सोडविला पाहिजे. जिल्ह्यातील एकाही गावात रोहित्रांच्या नादुरुस्तीमुळे वीज खंडीत होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना सुरु आहेत. परंतु केवळ कंत्राटदार वेळेत काम करत नसल्याने या योजनांचं काम वेळेत पुर्ण होत नसल्याच्याही तक्रारी येत आहेत. ज्या ज्या भागात कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा योजनांची कामे रखडलेली असतील अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.

First published:

Tags: Rajesh tope, Virus