जयपूर, 24 जून : सध्या कोर्टातील एक प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. कोर्टाने चक्क कोर्टात भगवानला हजर करण्याचे आदेश दिले आहेत. स्वर्गापासून पाताळापर्यंत शोधा पण काही करून भगवानला कोर्टात हजर करा, असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत (Swarg se patal tak khojo bhagwan ko dundho). या आदेशातील प्रतही व्हायरल झाली आहे ज्याची चर्चा सर्वत्र होते आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात (Rajasthan civil court order).
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील केशवराय पाटणने दिलेला हा अजब आदेश आहे. पाच वर्षांहून अधिक जुन्या प्रलंबित खटल्यासंबंधी कोर्टाने असा आदेश दिला आहे. आता भगवान म्हणजे नेमका कोण तर या प्रकरणातील साक्षीदार. ज्याचं नाव भगवान सिंह असं आहे. पण 'भगवान' आणि 'स्वर्गापासून पाताळापर्यंत शोधा', अशा आदेशामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
हे वाचा - वाजतगाजत वरात घेऊन आला नवरदेव; वधूपक्षाने हातपाय बांधून नवरीशिवायच पिटाळून लावलं
नुकतंच राजस्थान हायकोर्टाने पाच वर्षांपूर्वीची जुनी प्रकरणं लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश कोर्टांना दिले आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी केशवराय पाटणमधील न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाबाबत सुनावणी झाली. ज्यात भगवान सिंह साक्षीदार आहेत. पण तरी ते साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर झाले नव्हते.

पाच वर्षांहून अधिक जुन्या प्रलंबित खटल्यात वारंवार समन्स बजावल्यानंतरही साक्षीदार भगवान सिंह कोर्टात हजर झाले नाही. त्यामुळे कोर्टाला ही प्रकरणं निकाली लावता येत नाही आहेत. त्यामुळे आता न्यायाधीशांनी काप्रेन पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना आता वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.
हे वाचा - सर्पदंश झाला बायकोला आणि सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला नवरा
कोर्टातील सिव्हिल न्यायाधीश विकास नेहरा यांनी सांगितलं, साक्षीदार भगवान सिंह स्वर्गलोक ते पाताळलोकपर्यंत शोधा आणि साक्ष देण्याासठी हजर करा. जेणेकरून जुनं प्रकरण वेळेत निकाली लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.