मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी, 15 लाखांसाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानेच फोडला आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर!

मोठी बातमी, 15 लाखांसाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानेच फोडला आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर!

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बडगिरे याने त्याच्याच विभागातील संदीप जोगदंड यांच्याकडून 10 लाख आणि शाम म्हस्के यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन पेपर फोडला होता.

पुणे, 07 डिसेंबर :  आरोग्य विभागात (Maharashtra health department recruitment 2021) मोठा गाजावाजा करत परीक्षा घेण्यात आली होती. पण या भरती परीक्षा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. पण आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच (Health Department Recruitment exam paper leak case)  पेपर फोडल्याचं समोर आलं आहे. लातूर (latur) येथील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (Prashant Badgire Chief Administrative Officer Public Health Department Latur) यांनीच पेपर फोडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणामुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी जालन्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एक एक माहिती समोर येत गेली. अखेर आज पोलिसांनी एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. या अधिकाऱ्यानेच हा पेपर फोडल्याचं समोर आलं आहे.

लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनीच हा पेपर फोडला होता.

नव्या वर्षांत पुन्हा 6 नवीन मालिका! 2021 Year End लाच होणार धमाकेदार एंट्री

बडगिरे याने त्याच्याच विभागातील संदीप जोगदंड यांच्याकडून 10 लाख आणि शाम म्हस्के यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन पेपर फोडला होता. पुणे पोलिसांची सायबर शाखा या प्रकरणाचा तपास करत असून प्रशांत बडगिरेसह 11 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बडगिरे हा लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागात मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे, असं असतानाही 10 लाखांच्या लाचेसाठी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्यामुळे कुंपणाने शेत खाल्याचं समोर आलं आहे.

Online न दिसता WhatsApp वर मेसेज करायचाय? ही आहे सोपी पद्धत

चार दिवसांपूर्वीच जालन्यातून  पुणे येथील सायबर सेलच्या (cyber police pune) पथकाने  एका तरुणाला जालन्यातून (jalana) अटक करण्यात आली होती. 29 वर्षीय विजय प्रल्हाद मुराडे या तरुणाला अटक केली आहे. हा तरुण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी येथील रहिवासी आहे. अटक केलेल्या तरुणाला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

काय आहे प्रकरण?

31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोग्य विभागातील गड ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षा पार पडली. पण, पेपर सुरू होण्याआधी १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस स्टेशनमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणी आता पर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

First published: