मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video: आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान केंद्रावर घोळ, पुणे नाशिकमध्ये गोंधळ; राजेश टोपेंकडून स्पष्टीकरण

Video: आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान केंद्रावर घोळ, पुणे नाशिकमध्ये गोंधळ; राजेश टोपेंकडून स्पष्टीकरण

आजच्या आरोग्य विभागाच्या (Health Department Exams) परीक्षेत पुन्हा विविध केंद्रावर गोंधळ झाला आहे.

आजच्या आरोग्य विभागाच्या (Health Department Exams) परीक्षेत पुन्हा विविध केंद्रावर गोंधळ झाला आहे.

आजच्या आरोग्य विभागाच्या (Health Department Exams) परीक्षेत पुन्हा विविध केंद्रावर गोंधळ झाला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 24 ऑक्टोबर: आजच्या आरोग्य विभागाच्या (Health Department Exams) परीक्षेत पुन्हा विविध केंद्रावर गोंधळ झाला आहे. पुणे (Pune) आणि नाशिक (Nashik) येथील केंद्रावर (Exam Centre) घोळ झाला. आबेदा इनामदार कॉलेज कॅम्प, पुणे येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळचे 10.02 वाजूनही विद्यार्थ्यांना पेपर मिळालेला नव्हता आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. नाशिकमध्ये वेळ झाली तरी पेपर आलेच नव्हते.

परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असतानापुण्यातील आझम कॅम्पसमध्येही तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नव्हत्या. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आणि एकच गोंधळ झाला. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थी संख्येच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.

हेही वाचा- चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'AY-4'; सापडले 7 रुग्ण

पेपर मिळण्यात विलंब आणि आसनव्यवस्थेतील घोळावरुन परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. नाशिकमध्ये काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. आरोग्य भरतीच्या पेपरमधल्या आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ दिसत आहे.

पुण्यात भाजप आक्रमक

तब्बल दीड तास उशिरा पुण्यातील आझम कॅम्पस परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाची परीक्षा सुरू झाली. परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या युवा मोर्चाकडून परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. गृहखात्यात जसा सचिन वाझे आहे तसाच आरोग्य खात्यातही असल्याचा गंभीर आरोप यावेळी भाजपने लावला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ तांत्रिक अडचणीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलं आहे. या गोंधळामध्ये जेवढा वेळ विलंब झाला तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून मिळणार असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.

हेही वाचा- India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर आफ्रिदीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...

पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचंही स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं आहे.

First published:

Tags: Health, Nashik, Pune, Rajesh tope