इंदौर, 24 ऑक्टोबर: देशात आता कोरोना (Corona Virus) प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्याही (Corona Patients) नियंत्रणात आली आहे. मात्र अशातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. आतापर्यंत इंदौरमध्ये डेल्टा (Delta variant) आणि डेल्टा प्लस (Delta Plus variants) व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत होती. मात्र आता जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात AY-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आलं आहे. हा डेल्टाचाच एक नवीन व्हेरिएंट असल्याचं बोललं जात आहे.
इंदौरसह मध्य प्रदेशातून नवी दिल्लीतल्या NCDC लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची 7 प्रकरणं समोर आली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात AY-4 व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
हेही वाचा- Video: माणुसकी कुठे हरवली?, मदत करण्याऐवजी कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड
इंदौरमध्ये सध्या दररोज एक किंवा दोन कोरोनाचं रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. 1 ते 16 ऑक्टोबरपर्यंतचे नमुने पाठवण्यात आले होते. 16 ऑक्टोबरच्या अहवालात 7 नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यापैकी दोन जण न्यू पलासिया, एक दुबेची बागआणि तीन महू येथील आहेत. त्याच वेळी, 1 ऑक्टोबरपर्यंतच्या अहवालात, 13 पैकी एका नमुन्यात AY-4 आणि चार नमुन्यांमध्ये AY-12 व्हेरिएंट आढळून आला आहे.
हेही वाचा- India vs Pakistan Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला कधी आणि कुठे पाहता येणार?
यावर बोलताना एमजीएम ऑफ मेडिसिन, एमजीएम डॉ.व्ही.पी. पांडे म्हणाले की, कोरोना व्हायरसचे स्वरूप बदलत असतं. या प्रकाराच्या संसर्गाविषयी काहीही बोलणं योग्य नाही, कारण स्पष्ट अभ्यास झालेला नाही. दरम्यान भारतात दिली जाणारी लस सर्व प्रकारांवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. पुढील 4-5 वर्षे, आपल्याला दरवर्षी लस घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.