गोंदिया, 07 जुलै: परवाना नसताना (without license) चुकीच्या पद्धतीनं शस्त्रक्रिया (Surgery) केल्यानं एका 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू (Young woman death) झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरानं मृत तरुणीच्या डोक्यात मागच्या बाजूला असलेली गाठ चुकीच्या पद्धतीनं शस्त्रक्रिया काढल्यानं तिचा बेहाल होऊन तिसऱ्या दिवशीचं मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. संबंधित डॉक्टरकडे परवाना नसताना त्यानं चुकीच्या पद्धतीनं शस्त्रक्रिया केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, दमयंती सूरजलाल धुर्वे असं मृत पावलेल्या 21 वर्षीय तरुणीचं नावं असून ती देवरी तालुक्यातील मुरदोली येथील रहिवासी आहे. 23 जून रोजी डोक्यातील मागच्या बाजूस आलेली गाठ वेदना देत असल्यानं दमयंतीला डॉक्टरांकडे आणण्यात आलं होतं. याठिकाणी डॉक्टरनं चुकीच्या पद्धतीनं शस्त्रक्रिया करून ती गाठ काढली आणि गोळ्या औषध देऊन तरुणीला डिस्चार्ज दिला.
हेही वाचा-कोरोना, म्युकरमायकोसिस, बोन डेथ आणि आता ग्रीन फंगस; मुंबईवर आजारांचं संकट
पण घरी आल्यानंतर सायंकाळी तरुणीने गोळ्या खाल्ल्यानंतर तिला उलट्या सुरू झाल्या. तसेच चक्करही यायला सुरुवात झाली आहे. यामुळे मृताचे कुटुंबीयांनी तिला 24 जून रोजी पुन्हा संबंधित डॉक्टरकडे नेलं. पण डॉक्टरांनी तिला गॅसेसची समस्या असल्याचं सांगितलं. दरम्यान दमयंतीची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला पुन्हा संबंधित डॉक्टरांकडे नेलं. याठिकाणी डॉक्टरने तिला एक सलाइन लावून पुन्हा घरी जाण्यास सांगितलं.
हेही वाचा-आईच्या पोटात असल्यापासून ते जन्मानंतर; बाळांवर कसा परिणाम करतो कोरोनाव्हायरस?
पण दमयंतीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला गोंदियातील न्यू जानकी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी उपचारादरम्यान 26 जून रोजी दुपारी तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दमयंतीचा मृत्यू झाल्याचा दावा, करत कुटुंबीयांनी सालेकसा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास करत असता, आरोपी डॉक्टरनं दमयंतीच्या डोक्याच्या मागील बाजूस असणाऱ्या गाठीवर चुकीच्या पद्धतीनं शस्त्रक्रिया केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Maharashtra, Police action, Shocking news, Vidarbha