मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अल्पवयीन प्रेयसीसोबत मुंबईला पळून आला, पण तिच्या भावाने रेल्वेतून ढकलून घेतला जीव!

अल्पवयीन प्रेयसीसोबत मुंबईला पळून आला, पण तिच्या भावाने रेल्वेतून ढकलून घेतला जीव!

रत्नागिरी मेल कल्याण स्थानकात पोहचताच या सर्व आरोपींनी गाडीत प्रवेश करत या दोघांना शोधून काढले आणि साहिलला बेदम मारहाण करून कोपर ते दिवा दरम्यान ...

रत्नागिरी मेल कल्याण स्थानकात पोहचताच या सर्व आरोपींनी गाडीत प्रवेश करत या दोघांना शोधून काढले आणि साहिलला बेदम मारहाण करून कोपर ते दिवा दरम्यान ...

रत्नागिरी मेल कल्याण स्थानकात पोहचताच या सर्व आरोपींनी गाडीत प्रवेश करत या दोघांना शोधून काढले आणि साहिलला बेदम मारहाण करून कोपर ते दिवा दरम्यान ...

डोंबिवली, 26 जुलै : प्रेयसीच्या (girlfriend ) नातेवाईकांनी प्रियकराला धावत्या एक्स्प्रेसमधून (train) ढकलून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवली (dombivali) स्थानकाच्या पुढे घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या प्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी 10 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळालगत 19 जून रोजी साहिल हाश्मी (sahil hasmi) हा तरुण जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळून आला होता. जखमी साहिलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा पोलिसांकडून अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला आणि साहिलच्या मोबाईलमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. चहाच्या कपातली साखरही नाही शाकाहारी; उपवासासाठी वापरण्याआधी हे वाचा पोलिसाच्या तपासात साहिलबरोबर पळून आलेल्या अल्पवयीन तरुणीच्या चुलत भावाने आणि त्याच्या मित्रांनी साहिलला धावत्या एक्स्प्रेसमध्ये मारहाण करत कोपर ते दिवा दरम्यान गाडीतून ढकलून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी महिन्या भराच्या चौकशीअंती 10 जणांना अटक केली असून अन्य एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील भदोई येथे राहणारा साहिल हाश्मी हा तरुण अल्पवयीन प्रेयसीसमवेत 15 जून रोजी पळून आला होता. 18 जून रोजी रत्नागिरी एक्स्प्रेसने तो मुंबईकडे निघाला होता. ही गाडी 19 जून रोजी रात्री 10 वाजता कल्याण स्थानकात पोहचली होती. यानंतर रात्री 11 वाजता लोकलच्या मोटरमनला कोपर आणि दिवा दरम्यान रेल्वे रुळावर साहिल पडलेला आढळला. याबाबत डोंबिवली जीआरपीला माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या साहिलचा उपचारादरम्यान पाच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. या महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण? मात्र, तोपर्यंत त्याच्याबरोबर पळून आलेली अल्पवयीन तरुणी पुन्हा आपल्यामुळ गावी परत गेली होती. पोलिसांनी साहिलजवळ असलेल्या मोबाईल ताब्यात घेत त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नातवाईकांनी दिलेल्या माहितीनंतर, या प्रकरणाला वेगळं वळण लागले. सदर अल्पवयीन मुलगी साहिलबरोबर पळून गेल्याची कुणकुण तिच्या वडिलांना लागली होती. याबाबत त्यांनी तिच्या अंबरनाथमधील भावाला याची माहिती दिली. यानंतर तिच्या भावाने आपल्या गावातील कामानिमित्त मुंबईला असणाऱ्या इतर नातेवाईक आणि मित्रांना बोलावून घेत कल्याण स्थानक गाठले. रत्नागिरी मेल कल्याण स्थानकात पोहचताच या सर्व आरोपींनी गाडीत प्रवेश करत या दोघांना शोधून काढले आणि साहिलला बेदम मारहाण करून कोपर ते दिवा दरम्यान चालत्या गाडीतून त्याला ढकलून दिले. यात  साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचे वडील शब्बीर हाश्मी याच्यासह भाऊ कासीम हाश्मी, गुलाम हाश्मी, यांच्यासह  10 जणांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आल्याची माहिती डोंबिवली जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या