मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /News18 Exclusive | AK47 रायफल आणि शस्त्रांनी भरलेली बोट रायगडमध्ये समुद्रकिनारी आलीच कशी?

News18 Exclusive | AK47 रायफल आणि शस्त्रांनी भरलेली बोट रायगडमध्ये समुद्रकिनारी आलीच कशी?

 एके-47 रायफल आणि इतर शस्त्रांचा साठा (AK-47 assault rifles and other weapons) असलेली एक यॉट (Yacht) गुरुवारी 18 ऑगस्ट 2022 ला रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आली होती.

एके-47 रायफल आणि इतर शस्त्रांचा साठा (AK-47 assault rifles and other weapons) असलेली एक यॉट (Yacht) गुरुवारी 18 ऑगस्ट 2022 ला रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आली होती.

एके-47 रायफल आणि इतर शस्त्रांचा साठा (AK-47 assault rifles and other weapons) असलेली एक यॉट (Yacht) गुरुवारी 18 ऑगस्ट 2022 ला रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आली होती.

    रायगड, 19 ऑगस्ट :  एके-47 रायफल आणि इतर शस्त्रांचा साठा (AK-47 assault rifles and other weapons) असलेली एक यॉट (Yacht) गुरुवारी 18 ऑगस्ट 2022 ला रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आली होती. ही बोट मे-जून 2022 ला दुबईतून तीन क्रू मेंबर आणि 5 प्रवाशांना घेऊन निघाली होती अशी माहिती इंटिलिजन्स ब्युरोतील (Intelligence Bureau) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सीएनएन-न्यूज 18 ला दिली आहे.

    ओमानच्या आखाताच्या परिसरातील बिकट वातावरणामुळे आणि 16 बोटींनी डिस्ट्रेस कॉल म्हणजे अडचणीत सापडल्याचा संदेश तिथल्या अधिकाऱ्यांना 26 जूनला दिला होता. 27 जूनला कोरियाच्या नौदलाची बोट ‘ROKS Dae Jo Yeong’ वरील Combined Task Force (CTF)- 151 ने या बोटीवरील व्यक्तींची सुखरूप सुटका केली होती.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बोट टो करून नेत असताना शस्त्रास्त्रांनी भरलेली ही बोट पाण्यात बुडाली आणि तिचा नौदलाच्या बोटीशी असलेला संपर्क तुटला. रायगडमध्ये सापडलेल्या बोटीत असलेल्या एके शस्त्रास्त्रांचे सीरियल नंबर आणि ती पुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय सिक्युरिटी एजन्सी नेपच्युन सिक्युरिटी यांनी सांगितलेले सीरियल नंबर जुळले आहेत. त्यामुळे ती बोट नेपच्युन सिक्युरिटी एजन्सीची आहे हे सिद्ध झालं आहे.

    रायगडमधील संशयास्पद बोटीमुळे सावधगिरी; रायगड मुंबईसह पुण्यात हाय अलर्ट, शहरात नाकाबंदी

    दरम्यान, नेपच्युन मॅरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने (Neptune Maritime Security Agency) एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. ‘अरबी समुद्रातील मान्सूनमुळे ही बोट खराब झाली त्यामुळे बोटीवरील कॅप्टनला आणिबाणी जाहीर करावी लागली. जरी क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आलं असलं तरीही वातावरण प्रचंड विपरित असल्याने ती बोट आम्ही सुरक्षितस्थळी नेऊ शकलो नाही.

    आम्ही जी बोट समुद्रात बुडाली असा अंदाज बांधला होता ती बोट भारतीय समुद्रकिनाऱ्याला पोहोचली आहे असं आज सकाळी नेपच्युन कंपनीच्या P2P ग्रुपच्या लक्षात आलं होतं,’ असं नेपच्युन मेरिटाईम सिक्युरिटी कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी म्हणाले, ‘ लेड हॅन नावाच्या या बोटीची मालकीण ऑस्ट्रेलियातील महिला हॅना लाँडर्गन ही आहे. या बोटीवर तीन एके-47 रायफल्स, कागदपत्रं आणि कार्ट्रेज मिळाली असून, याबाबत तटरक्षक दलाला माहिती देण्यात आली आहे.

    AK-47, काडतुसं असलेल्या बोटीचा तपास महाराष्ट्र ATS कडे, एटीएस प्रमुखांकडून बोटीची पाहणी

    लाँडर्गन आणि त्यांचे पती बोटीचे कॅप्टन जेम्स हॉर्बर्ट हे या बोटीतून युरोपातून मस्कतला चालले होते. बोटीच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे त्यांनी आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती संबंधित यंत्रणेला दिली होती. दक्षिण कोरियाच्या युद्धनौकेने (South Korean Warship) तातडीने त्यांना वाचवलं पण समुद्रातील वातावरण खूपच बिकट असल्याने ही लहान बोट मात्र ते वाचवू शकले नाहीत.’

    गुरुवारी ही बोट आणि त्यात असलेल्या आरडीएक्स व शस्त्रास्त्रांमुळे 1993 मध्ये पहिल्यांदा बॉम्ब तयार करण्यासाठी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे आरडीएक्स आणलं होतं त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, दहशतवादी टायगर मेनन यांनी मुंबईमध्ये देशातील सर्वांत मोठे बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Attacks) त्या वेळी घडवले होते. त्यात अनेक निरपराध नागरिक, मुलं, स्त्री-पुरूषांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या कडवट आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

    First published:
    top videos

      Tags: ATS, Mumbai, Raigad