रायगड, 18 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट (Harihareshwar suspicious Boat) आढळून आली आहे. या या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहेत. याप्रकरणाची तपासणी आता महाराष्ट्र एटीएस करत आहे. महाराष्ट्र एटीएसचे (Maharashtra ATS) प्रमुख विनीत अग्रवाल यांनी या बोटीची पाहणी केली आहे. तपास अजून सुरू आहे. आम्हाला बोटीतून काही कागदपत्रं मिळाली आहेत. समुद्रातून आम्ही ही बोट बाहेर काढत आहोत, असं एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितलं.
Maharashtra | A boat with three AK-47 rifles was seized off Raigad coast today
— ANI (@ANI) August 18, 2022
The investigation is underway. We've retrieved some papers from the boat, more things lying inside the boat. We are trying to pull the boat away from the sea: State ATS Chief Vineet Agrawal pic.twitter.com/W9HVS4Cw8D
दरम्यान या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएस करेल, बोटीतून काही बंदुका आणि राऊंड्स सापडल्या आहेत. बोट आता सुरक्षित असून यामागे दहशतावादाचा संबंध आहे का नाही, हे नंतर स्पष्ट होईल, असं कोकण भागाचे आयजी संजय मोहिते यांनी स्पष्ट केलं.
Maharashtra | A boat with a few weapons seized off Raigad coast today, near the Harihareshwar area... Maharashtra ATS will be on it; the boat is secured as of now. To rule out the terror angle or not will be decided later: Sanjay Mohite, Inspector General of Police, Konkan Range pic.twitter.com/tK9oDF6xxZ
— ANI (@ANI) August 18, 2022
फडणवीस काय म्हणाले? रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती, असं फडणवीस म्हणाले.
रायगड जिल्ह्यात सापडलेल्या संशयास्पद बोटीविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. बोट कोणाची होती, कुठून कुठे जात होती, याविषयी महत्त्वाचे डिटेल्स त्यांनी दिले. #HariharshwarBoat #Harihareshwar pic.twitter.com/Nq3b40bp2y
— News18Lokmat (@News18lokmat) August 18, 2022
या घटनेचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. याचा बारकाईने तपास सुरू आहे, सर्व भागात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्यासोबत को ऑर्डिनेशन सुरू आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं. 26 जूनला या बोटीचं इंजिन निकामी झालं त्यानंतर कोरियन युद्धनौकेनं त्यांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले.समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्रातल्या अंतर्गत प्रवाहामुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली. रायगडमध्ये आणखी एक बोट आढळली, काही जण पळून गेल्याचा संशय

)







