रत्नागिरी, 18 ऑगस्ट : कोरोनानंतर दापोली तालूक्यात (Ratnagiri Dapoli) आडे गावी पारंपारीक पद्धतीने गोविंदा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे सण उत्साहात साजरे करता आले नसल्याने यंदा सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. दापोली तालुक्यात गोपाळकाला मोठ्या जल्लोषी वातावरणात होत आहे. दापोली तालुक्यातील आडे गावात पूर्वापार आलेल्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम होत असल्याने लोकांचा उत्साह भरून वाहत आहे.
मागचे दोन वर्षे कोरोनाच्या उद्रेकामुळे सगळ्यांच सणांवर निर्बंध लावण्यात आले होते. यंदा मात्र सणांवरील निर्बंध हटवल्याने लोक सण साजरे करताना दिसत आहेत. दापोली तालुक्यात कित्येक वर्षांपासून हा सण साजरा केला जातो. यंदा आडे गावातील सर्वच स्तरातील लोकांनी यात सहभाग घेतल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीही पहायला मिळाली.
हे ही वाचा : ‘माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो-गोविंदांनो’, दहीहंडीआधी जितेंद्र आव्हाड इमोशनल!
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडी कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा केली. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावांत पारंपरिक पद्धतीने गोविंदा सण साजरा होतो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गावातून अशा वाजत गाजत मिरवणुका निघतात. दापोली तालुक्यात आडे गावी साजरा झालेला गोविंदांचा सण. #Janmashtami #dahihandi #govinda #Konkan pic.twitter.com/DG2fGI2E1Y
— News18Lokmat (@News18lokmat) August 19, 2022
दहीकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव म्हणजे मराठी मनामनांत उधाणलेला उत्साह. या उत्सव, उत्साहातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करूया, त्यातून येणारी समृद्धी, आनंद, समाधानाची लयलूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा : येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान
गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभागी होताना पुरेशी काळजी घ्यावी, आयोजकांनीही सतर्कता बाळगून उत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गेली दोन वर्षे निर्बंधांमुळे या उत्सवाच्या उत्साह, जल्लोष आणि आनंदाला मुकलो होतो. पण यंदा मात्र सुदैवाने संधी मिळाली आहे,तर खबरदारी घेऊन या उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटूया. भगवान श्रीकृष्ण यांनी दाखवलेल्या आव्हानांवर मात करण्याच्या मार्गावर चालताना, या उत्सवाकडून प्रेरणा घेऊन विकासाला गवसणी घालण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया. त्यासाठी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीकाला उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा.