मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, हे ठरवून घडलं', देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, हे ठरवून घडलं', देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

शिवसेवेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते अचानक मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते ठरवून घडलं, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

शिवसेवेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते अचानक मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते ठरवून घडलं, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

शिवसेवेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते अचानक मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते ठरवून घडलं, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 23 जुलै : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. विशेष म्हणजे शिवसेवेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते अचानक मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते ठरवून घडलं, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचं देखील स्पष्ट केलं.

"महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचं एकत्र सत्ता स्थापन झालं आणि अनेक कथा, कहाण्या तयार झाल्या. कारण हे खरंच आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, ही घोषणा झाली त्यावेळेस आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं. पण हे काही अचानक घडलं नव्हतं. हे ठरवून घडलं होतं. आज एवढे मोठे लोकं घेवून येत असताना त्यांना नेतृत्व देणं महत्त्वाचं होतंच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं होतं की, भाजप सत्तापिपासू नाही. केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो, अशापैकी आम्ही नाही आहोत. आमची विचारांची लढाई आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(VIDEO : 'दुःख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं', चंद्रकांत पाटलांचा 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ भाजपने हटवला)

"त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. ती शिवसेना म्हणजे आता अल्पसंख्यात उरली आहे. आपल्यासोबत खरी शिवसेना आहे. कारण शिवसेना पक्ष नाही तर विचार आहे. आणि ते विचार जे जिवंत ठेवतील तीच खरी शिवसेना. तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी स्वत: याचा साक्षीदार आहे. कुठलाही शब्द देण्यात आलेला नव्हता. मी स्वत: तिथे बसलो होतो. काय बोलायचं हे त्याठिकाणी ठरलं. त्यानुसार मी वक्तव्य केलं. प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सांगायचे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असल्याचं सांगायचे. उद्धव ठाकरे स्वत: म्हणाले. चंद्रकांत दादा आपण भोळे लोकं आहोत. आपण निवडणुकीच्या काळात आपल्या युतीचे उमेदवार निवडून यायला हवे म्हणून बंडखोर उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायला लावली", अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले फडणवीस?

"मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. कुठल्याही सरकारचे एकच मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री हेच नेते असतात. त्यामुळे आपले नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. ते मी याकरता सांगतोय की, मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी एवढंच सांगितलं, आपल्याला हे माहिती नव्हतं. आपल्याला वाटलं आपलंच सरकार येणार आहे. आपल्याला आपलाच मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे. अचानक हा निर्णय आल्यामुळे धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कुणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा आपलं वेगळं मत आहे, असं बिल्कूल नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळे एकत्रित होतो. आता हे चालत असतं. माध्यमांचं काम असतं. ते त्यांचं काम करत असतात. आता शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. हे सरकार अडीच वर्षाचा कार्यकाळा पूर्ण करेलच त्यासोबत भव्य जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

"अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं", असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

"दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस. ये सगळे चुटुरपुटुर आहेत ना, वर्ष-सहा महिने, केंद्राने बोलावलं की घरी. अशांच्या पार्श्वभूमीवर सलग पाच वर्ष देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपण कल्पना करा त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागली", अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली

First published: