मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अजितदादा म्हणाले, 'प्रशिक्षणाला येतो', फडणवीसांनी दिले खुमासदार उत्तर, म्हणाले...

अजितदादा म्हणाले, 'प्रशिक्षणाला येतो', फडणवीसांनी दिले खुमासदार उत्तर, म्हणाले...

ज्या पद्धतीने ते पाच सहा कारखान्याचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो

ज्या पद्धतीने ते पाच सहा कारखान्याचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो

ज्या पद्धतीने ते पाच सहा कारखान्याचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  sachin Salve

नागपूर, 1 ऑक्टोबर : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अजितदादांनी प्रशिक्षण कधी मिळेल, अशी विचारणाच फडणवीसांना केली. तर, फडणवीस यांनीही ऑनलाईन प्रशिक्षण करू, अशी कोपरखळी लगावली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आल्यामुळे अजितदादांनी आपल्या शैलीत टीका करत फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेणार, असा टोला लगावला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याचे म्हटलं होतं, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'त्यांना एवढी तसदी घेण्याची गरज नाही, ऑनलाईन प्रशिक्षण करू, गुरुकिल्ली एवढीचं सांगतो, की ज्या पद्धतीने ते पाच सहा कारखान्याचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो' असा टोलाही फडणवीस यांनी अजितदादांना लगावला.

('त्याबद्दल मला प्रशिक्षण द्या, जरा ज्ञानात भर पाडून घेतो'; अजित पवारांचा फडणवीसांना मिश्किल टोला)

तसंच, गडचिरोली आणि वर्ध्याला डीपीडीसीची बैठक घेणार आहे, त्यानंतर भंडारा आणि नागपूरची बैठक घेणार आहे. येत्या आठवड्या भरात सहा जिल्ह्याच्या बैठका पूर्ण करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते नागपुर विमानतळावर बोलत होते.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना आता पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे? असं त्यांना विचारतो आणि ज्ञानात भर पाडून घेतो, असा मिश्किल टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला.

First published:

Tags: Marathi news