मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज ठाकरेंचा 'तो' खास व्हिडीओ पोस्ट करत मनसेकडून बाळासाहेबांना अभिवादन; जुन्या आठवणींना उजाळा

राज ठाकरेंचा 'तो' खास व्हिडीओ पोस्ट करत मनसेकडून बाळासाहेबांना अभिवादन; जुन्या आठवणींना उजाळा

आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त मनसेने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. राज ठाकरे यांनी ज्यावेळेला शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेची आठवण करून देणारा हा व्हिडीओ आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी :  आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला याची आठवण करून देणारा हा व्हिडीओ आहे. शिवसेनेमधून ज्यांनी-ज्यांनी बंड केलं त्यांच्यापेक्षा आपली भूमिका कशी वेगळी होती हेही या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय? 

आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त मनसेने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला याची आठवण करून देणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना 'जा लढ, मी आहे... काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात... राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा 'राज'कीय संवाद !' असं कॅप्शन देखील या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

राज ठाकरेंचा संवाद  

या व्हिडीओमध्ये राज ठाकरे हे संवाद साधताना दिसत आहेत. जेव्हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलो होतो तेव्हा ते आपल्याला काय म्हणाले हे या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसेच माझी तुलना पक्ष सोडून गेलेल्या इतर नेत्यांच्या बंडाशी करू नका, कारण ते बंड करून सत्तेत सहभागी झाले तर मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून बाहेर पडलो, असं राज ठाकरे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

First published:

Tags: MNS, Raj Thackeray