जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सरपंच, ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण

सरपंच, ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

Suicide in Gondia: आमगाव (Amgaon) तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत (Gosaitola Grampanchayat) कार्यरत असणारे 45 वर्षीय कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या (employee commits suicide) केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गोंदिया, 06 जून: आमगाव (Amgaon) तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत (Gosaitola Grampanchayat) कार्यरत असणारे 45 वर्षीय कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या (employee commits suicide) केली आहे. मृत रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. रंगारी यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे. मृत संजय रंगारी शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. पण काल सकाळी रंगारी यांच्या शेतीच्या बाजूला राहणाऱ्या एका शेतकऱ्याला त्यांचा मृतदेह झाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्याने त्वरित मृताच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. यावेळी पोलिसांना मृताच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये गोसाईटोला ग्रामपंचायतील ग्रामसेवक, सरपंच आणि अन्य ग्रामसदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. आरोपींनी आपल्या पदावरून काढण्याची धमकी दिली होती, असंही या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. हे ही वाचा- VIDEO: वाळूचा ट्रक अडवल्यानं महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल पदावरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे तणावात आलेल्या रंगारी यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हिवकराज रंगारी यांच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक, सरपंच आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा  पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात