जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: वाळूचा ट्रक अडवल्यानं महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

VIDEO: वाळूचा ट्रक अडवल्यानं महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

VIDEO: वाळूचा ट्रक अडवल्यानं महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबारमधील (Nandurbar) भाजप नगरसेवक (BJP corporator) गौरव चौधरी (Gaurav Chaudhari) यांनी एका वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण (Woman talathi Beat) केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नंदुरबार, 06 जून: नंदुरबारमधील (Nandurbar) भाजप नगरसेवक (BJP corporator) गौरव चौधरी (Gaurav Chaudhari) यांनी एका वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण (Woman talathi Beat) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी नगरसेवक गौरव चौधरी याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ (Abuse) करत मारहाण केली आहे. याप्रकरणी महिला तलाठीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. खरंतर भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक (Sand Truck) करणाऱ्या वाहनाकडे गुजरातहून महाराष्ट्रात वाळू वाहतूक करण्यासंबंधित स्वामीत्व पावती नव्हती. त्यामुळे संबंधित महिला तलाठीने वाळूचा ट्रक दोन तास अडवून धरला. दरम्यान चालकाने वाळूचा ट्रक पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे महिला तलाठी निशा पावरा यांनी आपल्या अन्य दोन सहकारी महिलांसोबत पाठलाग करून हा ट्रक पकडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ट्रकचे मालक आणि भाजप नगरसेवक गौरव चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिला तलाठ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. यानंतर गौरव चौधरी यांनी महिला तलाठीला शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या महिला तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपी नगरसेवकाला अटक करावी यासाठी महिला तलाठ्यासह अन्य अधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.

हे ही वाचा- जिल्हाधिकाऱ्यांची फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आला ‘हा’ मेसेज; लोक हैराण दुसरीकडे, भाजप नगरसेवक गौरव चौधरीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणालाही मारहाण न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय संबंधित महिला तलाठीकडून वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी लाचखोरी मागितल्याचा आरोपही गौरव चौधरी यांनी केला आहे. संबंधित महिला तलाठी स्वतः पाय अडकून खाली पडल्याचा दावाही नगरसेवकाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी वाळू ट्रकचा चालकानेही नंदुरबार शहर पोलिसांत महिला तलाठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात