मुंबई, 09 नोव्हेंबर : राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यनंतर मागच्या 15 दिवसांपूर्वी पहिल्या टप्पातील 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक पार पडली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातही 7 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा जाहीर झाल्या आहेत. या निवणुकांमुळे गावागावात धुरळा उडणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने परिपत्रक जाहीर करून आचारसंहिताही लागू केली आहे. 18 डिसेंबर मतदानाची प्रक्रिया होणार आहे तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या आता दुसऱ्या टप्प्यात 7700 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राज्यातील कोल्हापूर, सांगली, नांदेड, अहमदनगर, अकोला अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, नाशिक, वाशिम, यवतमाळ अशा 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
हे ही वाचा : BREAKING: ED ला न्यायालयाचा धक्का, संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
राज्य निवडणूक आयोगाने दि. 07 नोव्हेंबर 2022 रोजी एक परिपत्र काढून ग्रामपंचायत निवडणूक कशापद्धतीने घ्यावी, त्याची आचारसंहिता प्रत्येक जिल्ह्याला पाठविली आहे. यामध्ये मतदार याद्या, निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदीबाबत सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्वतंत्ररीत्या निवडणूक कार्यक्रम येणार आहे.
अशी असेल आचारसंहिता प्रक्रीया
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे. तसेच ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू असणार आहे.
हे ही वाचा : संजय राऊतांच्या जामिनाविरोधात ED हायकोर्टात, राऊत जेलबाहेर येणार का नाही? लवकरच फैसला
निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील. असा आदेश काढण्यात आला आहे.