नागपूर, 18 जानेवारी: महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) मतमोजणी सुरू आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या गटाने एकहाती विजय मिळवला आहे. काटोल (Katol) मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. काटोल तालुक्यातील तिनही ग्रामपंचायतीवर तर नरखेड तालुक्यातील 17 पैकी 16 ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.
हेही वाचा...राज्यभर शिवसेनेची जोरदार मुसंडी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
काटोल तालुक्यातील भोरगडमध्ये 9 पैकी 9 ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायतमध्ये 7 पैकी 7 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये 9 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहे.
नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने नरखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत मध्ये 13 पैकी 10 जागांवर, थडपवनी येथे 9 पैकी 9 जागांवर, महेंद्री येथे 7 पैकी 6, खैरगाव येथे 13 पैकी 10, सिंजर येथे 7 पैकी 5, अंबाडा येथे 9 पैकी 7, सायवाडा येथे 9 पैकी 6 राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झाले. मदना येथे राष्ट्रवादी व शिवसेनासोबत लढली होती. येथे एकहाती या आघाडीने सत्ता मिळवित 9 पैकी 9 ही जागेवर विजय प्राप्त केला आहे.
तसेच नागपूर तालुक्यातील बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व 9 ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले आहे.
दरम्यान, विदर्भातीत वंचित बहुनज आघाडीने आपलं खातं उघडलं आहे. अकोल्यातील सांगवी खुर्द ग्रामपंचायतीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील विविध भागांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही वंचित आघाडीने विजयी घोडदौड सुरू असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आणखी किती ग्रामपंचायतींमध्ये वंचितकडून विजयी फडकावली जाते, हे पाहावं लागेल.
दरम्यान, 15 जानेवारी रोजी राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले.
हेही वाचा..जळगाव जिल्ह्यात 'या' ग्रामपंचायतीत तृतीयपंथी उमेदवारानं खेचून आणली विजयश्री
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय टक्केवारी...
ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.