मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यभर शिवसेनेची जोरदार मुसंडी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यभर शिवसेनेची जोरदार मुसंडी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

आतापर्यंत भाजपने 456, शिवसेनेनं 435, राष्ट्रवादीने 323 तर काँग्रेसने 331 इतक्या ग्रामपंचायतींवर विजय झेंडा फडकवला आहे.

आतापर्यंत भाजपने 456, शिवसेनेनं 435, राष्ट्रवादीने 323 तर काँग्रेसने 331 इतक्या ग्रामपंचायतींवर विजय झेंडा फडकवला आहे.

आतापर्यंत भाजपने 456, शिवसेनेनं 435, राष्ट्रवादीने 323 तर काँग्रेसने 331 इतक्या ग्रामपंचायतींवर विजय झेंडा फडकवला आहे.

मुंबई, 18 जानेवारी : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांकडून जल्लोष सुरू आहे, तर काही भागांमध्ये मात्र दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. राज्य सरकारचं नेतृत्व करत असणाऱ्या शिवसेनेनं या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. यासंदर्भात आता पक्षाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि एकूणच महाविकास आघाडीच्या सोबत आहे. कोराना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत. त्यामुळे शहरापासून गावांपर्यंत लोकांचा सरकारवर विश्वास आहे,' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर पक्षीय गणितं वेगळी असली तरीही आमदार आणि खासदारांचे समर्थक गट या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कोणता पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत, हे महत्त्वाचं ठरतं.

कुणाला किती जागा मिळाल्या?

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. या निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आतापर्यंत भाजपने 456, शिवसेनेनं 435, राष्ट्रवादीने 323 तर काँग्रेसने 331 इतक्या ग्रामपंचायतींवर विजय झेंडा फडकवला आहे. तसंच अपक्षांनीही 620 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, 'ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. ग्रामीण भागात महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी आहे. त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीत उमटले आहेत. 14 हजार गावांपैकी 6 हजार गावांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष असेल,' असा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

First published:

Tags: Aaditya thackeray, Breaking News, Gram panchayat