जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरणावरून वाद पेटला, शरद पवारांवर पडळकरांची बोचरी टीका

जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरणावरून वाद पेटला, शरद पवारांवर पडळकरांची बोचरी टीका

जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरणावरून वाद पेटला, शरद पवारांवर पडळकरांची बोचरी टीका

जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केल्याचं जाहीर केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 12 फेब्रुवारी: जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 13 फेब्रुवारी अर्थात उद्या शनिवारी शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं पण त्याआधीच गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटेच त्याचं उदघाटन उरकून टाकल्याचा दावा केला आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी आणि पडळकर हे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते पुतळ्यापर्यंत पोहोचले होते पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं. त्यावेळी पोलीस आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये त्याठिकाणी बाचाबाचीही झाली. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी पायऱ्यांवरून खाली येत पुतळ्याचं उद्धाटन झाल्याचं परस्पर जाहीर करून टाकलंय. ते यावेळी असं म्हणाले की, शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होऊ नये.

जेजुरी संस्थानाने अहिल्यादेवीचा पुतळा गडावर उभारला असून उद्या पवारांच्याहस्ते त्याचं अनावरण होतंय पण त्याआधीच भाजप आमदार आणि धनगर युवा नेते पडळकर यांनी तिथं जाऊन उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान जेजुरी देवस्थानने पडळकर यांच्या या कृत्याचा निषेध केला असून, पवारांच्या हस्ते पुतळा अनावरणाचा उद्याचा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणारच असा खुलासा संदिप जगताप यांनी जेजुरी देवस्थान तर्फे केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात