कोझिकोड 08 ऑगस्ट: केरळमध्ये शुक्रवारचा दिवस हा ब्लॅक फ्रायडे ठरला. दोन मोठ्या दुर्घटनांनी मोठी खळबळ उडाली. मुन्नार इथे शुक्रवारी सकाळी भूस्खलन झालं आणि त्यात 80 मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर आली त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला तर शुक्रवारी रात्री भीषण विमान अपघात घडला.
वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळला येणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 123 जण जखमी आहेत. या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. अशातच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी होतं आणि पावसाचा जोर वाढल्यानं धुसर दिसत होतं.
#UPDATE: Death toll in the flight crash landing incident at #Kozhikode rises to 17 including two pilots, according to Air India Express statement. pic.twitter.com/Hh84tDc3pn
— ANI (@ANI) August 7, 2020
#WATCH Kerala: Dubai-Kozhikode Air India flight (IX-1344) that skidded during landing at Karipur Airport. (earlier visuals)
The flight was carrying 190 people; injured shifted to hospitals in Malappuram & Kozhikode. Death toll in the flight crash landing incident is at 16. pic.twitter.com/ZrDQDjfOSg — ANI (@ANI) August 7, 2020
मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी साठलं होतं याचवेळी विमान स्पीडने लँड झाल्यानं धावपट्टीवरून घसरून ते 35 फूट खोल खाली कोसळलं आणि दोन तुकडे झाले. धावपट्टीवरील पाण्यामुळे विमान घसरल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, एअर इंडियाचं हविमान रनवेवरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. 'वंदे भारत मिशन'च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.