जळगाव, 24 नोव्हेंबर: जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील आमदडे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ‘मनी हाइस्ट’ स्टाइल दरोडा (Money Heist style robbery) टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. हा दरोडा दुसरा तिसरा कोणी टाकला नसून बँकेच्या शिपायानंच टाकला आहे. चोरट्यांनी सोमवारी रात्री 12 च्या सुमारास बँकेत प्रवेश करून बँकेतील 3 कोटी 17 लाख 79850 रुपये किमतीचं साडे सहा किलो सोनं लुटलं (theft 6.5 kg gold) आहे. पण अवघ्या तीन तासात पोलिसांनी या जबरी दरोड्याची उकल केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी शिपायासह त्याच्या दोन साथीदाराला बेड्या ठोकल्या (3 arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. राहुल अशोक पाटील असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव असून तो संबंधित बँकेत शिपाई म्हणून काम करतो. तर विजय नामदेव पाटील (वय-39) आणि बबलू ऊर्फ विकास तुकाराम पाटील (वय-37) असं अटक केलेल्या अन्य दोन साथीदारांची नावं आहेत. संबंधित सर्वजण भडगाव तालुक्यातील आमदडे गावातील रहिवासी आहेत. आरोपी राहुल यास बँकेतील सर्व माहिती असल्यानं तिघांनी अत्यंत शिताफीने बँकेवर दरोडा टाकला होता. पण त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला आहे. हेही वाचा- एक घाव अन् खेळ खल्लास; नांदेडात पोटच्या लेकानं जन्मदात्याला दिला भयावह मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल पाटील याने गावातील आपले दोन मित्र विजय आणि विकास यांच्याशी संगनमत करत भडगाव तालुक्यातील आमदडे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा टाकण्याची योजना आखली होती. आरोपी तिघांनी बनवलेल्या प्लॅननुसार, सोमवारी रात्री बँकेत प्रवेश केला. यावेळ भामट्यांनी बँकेच्या तिजोरीतून साडेसहा किलो वजनाचे दागिने लंपास केलं. आरोपीनं हे सर्व दागिने आरोपी विजय आणि विकास यांच्या शेतात नेवून पुरले. यावेळी आरोपींनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर मशीन देखील एका विहिरीत फेकून दिलं आहे. हेही वाचा- सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय; महिलेनं भररस्त्यात केलेल्या कृत्यानं नगर हादरलं यानंतर आरोपी राहुल पाटील यांनं रात्री एकच्या सुमारास गावच्या प्रमुख व्यक्तींना बँकेवर दरोडा पडल्याची माहिती दिली. यामुळे अनेक लोकांनी बँकेच्या दिशेनं धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भडगाव पोलीसही रात्री चारच्या सुमारास गावात दाखल झाले. शिपाई सचिन पाटील याच्यावर संशय आल्यानं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत, पोलीसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.