गडचिरोली, 03 मे : गडचिरोली (gadchiroli) आणि चंद्रपूरमध्ये (chandrapur) गेल्या काही दिवसांपासून वाघांचे (tiger attack) माणसांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. अशीच एक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी आलेल्या तरुणावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उसेगावच्या जंगलात ही घटना घडली आहे. अजित नाकाडे असं मृत तरुणाचे नाव आहे. देसाईगंज तालुक्यात कोरेगाव चोप इथं राहणार अजित नाकाडे हा आपल्या मैत्रिणीसोबत उसेगावच्या जंगलात फिरण्यासाठी आला होता. जंगलात फिरत असताना त्यांना काही स्थानिकांनी पाहिले आणि हे वाघाचे क्षेत्र आहे, पुढे जाऊ नका असा सल्ला दिला होता. पण, ग्रामस्थांना सल्ला झुगारून अजित आपल्या मैत्रिणीसोबत जंगलात फिरण्यासाठी गेला. जंगलात एका ठिकाणी बसलेले असताना अचानक वाघाने दोघांवर हल्ला केला. वाघाने अचानक हल्ला केल्यामुळे दोघांचा एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला. पण, वाघाने तोपर्यंत अजितचा पडशा पाडला होता. तर त्याची मैत्रीण जखमी झाली. ( Akshaya Tritiya: सूर्यास्तानंतर ‘या’ 6 गोष्टींचं कधीही करू नका दान ) जंगलात आरडाओरडा ऐकू आल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यामुळे वाघाने जंगलात धूम ठोकली. घटनेची माहिती तातडीने वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत अजितचा मृतदेह जंगलातून आणण्यात आला आहे, तर जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ( याचा फैसला एकदा होऊनच जाऊ दे’, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज ) दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील सोमनाथ टेकड्यांच्या पायथ्याशी वाघाने एका गुराखीवर हल्ला केला होता. यात त्यांचा मृत्यू झाला. गजानन गुरनुले 60 असे मृतकाचे नाव आहे. शिवारात बैल चराईसाठी गेले होते. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. धक्कादायक म्हणजे, 2021 च्या उन्हाळ्यात सुद्धा गजानन गुरनुले यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. त्यावेळी ते गंभीर जखमी झाल होते. मात्र वर्षभरानंतर वाघाच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. ठार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.