मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सूर्यास्तानंतर ‘या’ 6 गोष्टींचं कधीही करू नका दान; घराच्या सुखसमृद्धीसाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

सूर्यास्तानंतर ‘या’ 6 गोष्टींचं कधीही करू नका दान; घराच्या सुखसमृद्धीसाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

 अक्षय्य तृतीया हा एक मुहूर्त (Shubh Muhurta) मानला जातो. कोणतंही शुभ काम करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो.

अक्षय्य तृतीया हा एक मुहूर्त (Shubh Muhurta) मानला जातो. कोणतंही शुभ काम करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो.

शास्त्रानुसार दानाचे काही नियम आहेत आणि कधी कोणतं दान दिल्यानं चांगलं फळ मिळतं हेही सांगण्यात आलं आहे.

    दिल्ली, 3 मे: हिंदू धर्मात दानाचं खूप महत्त्व (Donation) आहे. दानामुळे पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya) केलेलं दान तर सर्वांत श्रेष्ठ समजलं जातं. या दिवशी दान केलं तर भरभरून वैभव लाभतं, असं मानतात.  गरजूंना कोणत्याही वस्तूचं दान केल्यास घरात सुखसमृद्धी येते असं मानलं जातं. दान आणि पुण्य हे मुक्तीचे मार्ग आहेत, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. त्यामुळेच दान करण्याची कोणतीही संधी सोडू नसे असं म्हटलं जातं. विविध कारणांनी किंवा काही विशेष प्रसंगी काही विशिष्ट वस्तूंचं दान करण्याला खूप महत्त्व आहे. कोणत्याही वस्तूची किंमत न घेता ती वस्तू देऊन टाकणे याला दान म्हटलं जातं. एका हिंदी वेबसाइटने दान कसं करावं आणि काय टाळावं याविषयी माहिती दिली आहे.

    आपल्या संपूर्ण उत्पन्नातला काही भाग गरजू किंवा गरिबांना दानाच्या स्वरूपात (Donation to Needy) दिला, तर त्यामुळे पुण्य मिळतं असं ज्योतिषशास्त्रात मानलं गेलं आहे. शास्त्रानुसार दानाचे काही नियम आहेत आणि कधी कोणतं दान दिल्यानं चांगलं फळ मिळतं हेही सांगण्यात आलं आहे. सूर्यास्तानंतर कोणत्याही वस्तूचं दान केलं किंवा विनाकारण कोणतीही गोष्ट कोणाला देऊन टाकली, तर त्यामुळे घरातलं आनंदी वातावरण नष्ट होतं आणि घराची आर्थिक परिस्थिती बिघडते असं मानलं जातं. कोणत्या सहा गोष्टींचं दान सूर्यास्तानंतर करू नये, याची माहिती घेऊ या.

    वाचा - सरळ फेकून देतात! आंबा खाणाऱ्या कित्येक लोकांना कोयचे हे फायदे माहीतच नाहीत

    घरात सुखसमृद्धी, आनंद, शांतता कायम हवी असेल तर त्यासाठी नेमकं काय आणि कोणत्या वेळेस दान केलं पाहिजे हे जाणून घेऊ या. सूर्यास्तानंतर काही गोष्टींचं दान (Avoid Donating These Thing After Sunset) केल्यास ते अशुभ असतं असं शास्त्रात सांगितलं आहे. कदाचित त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते, असं म्हणतात.

    पैशांचं दान वर्ज्य (Avoid Money Donation)

    सूर्यास्तानंतर कोणालाही पैशांचं दान करू नये हे तर तुम्हाला माहिती असेलच. संध्याकाळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते असं मानलं जातं. त्यामुळे या वेळेस पैसे म्हणजेच तुमच्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याला दान केल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. यामुळे अर्थातच तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. अगदी एखाद्या गरजू माणसालाही सूर्यास्तानंतर पैसे द्यायचे असतील तर सकाळ होईपर्यंत म्हणजेच उजाडण्यापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करावा.

    संध्याकाळी दुधाचं दान टाळा

    खरं तर दुधाचं दान केल्यानं विशेष फळ मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे. पांढऱ्या रंगाचं असल्यानं दुधाचं दान चंद्रासाठी विशेष लाभदायी असतं असं म्हणतात.

    वाचा - रस्त्यावर पडलेली नाणी-नोट उचलावी की नाही? पैसे सापडणं शुभ आहे की अशुभ

    विशेषत: सोमवार आणि शुकवारी दुधाचं दान दिल्यानं जास्त फलदायी असतं असं म्हणतात; मात्र चुकूनही सूर्यास्तानंतर दुधाचं दान करू नये. सूर्यास्तानंतर दुधाचं दान केल्यानं लक्ष्मी माता आणि विष्णू दोघेही नाराज होतात. त्यामुळे घरातली आर्थिक स्थिती वाईट होऊ शकते असं मानलं जातं. अगदी संध्याकाळच्या वेळेस तुमच्या शेजाऱ्यांनी जरी दूध मागितलं, तरी ते देण्याचं टाळा. अशा वेळेस दूध दिल्यानं घरातला आनंद, शांतता कमी होते असं म्हणतात.

    दह्याचं दान करू नका

    शास्त्रामध्ये सूर्यास्तानंतर दह्याचं दान करणंही वर्ज्य सांगितलं आहे. दह्याचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि व्यक्तीच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ करणारा शुक्र ग्रहच असतो असं मानलं जातं. त्यामुळे सूर्यास्तानंतर दह्याचं दान केल्यास शुक्र नाराज होऊ शकतो आणि सुख-समृद्धी कमी होऊ शकते असं म्हटलं जातं.

    तुळशीचं रोप देऊ नका

    सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाचं दान कधीही करू नये. खरं तर शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्शही करू नये असं म्हटलं जातं. सूर्यास्तानंतर तुळशीला पाणीही घालू नये असं सांगितलं गेलं आहे. सूर्यास्तानंतर तुळशीचं दान दिल्यास विष्णू भगवान नाराज होतात आणि घरातली शांतता नष्ट होते असं मानलं जातं.

    हळदीचं दान टाळा

    ज्योतिषशास्त्रानुसार हळद शुभ मानली जाते. कोणत्याही शुभकार्यात हळदीचा वापर आवर्जून केला जातो. हळदीला बुध ग्रहाचा कारक मानलं जातं. त्यामुळेच सूर्यास्तानंतर कोणालाही हळद देऊ नये असं म्हणतात. संध्याकाळी हळद दिल्यास बुध ग्रह कमकुवत होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागतो. इतकंच नाही, तर घरात यामुळे विनाकारण भांडणं-वादविवादही होऊ शकतात.

    लसूण आणि कांदा

    सहसा कोणी लसूण किंवा कांद्याचं दान देत नाही; पण एखाद्या वेळेस तुमचे शेजारी अगदी संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर कांदा किंवा लसूण मागायला आले तर ते देऊ नका. केतू ग्रह हा अनिष्ट शक्तींचा स्वामी आहे. सूर्यास्तानंतर कुणाला कांदा किंवा लसूण देण्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तसंच तुम्ही एखाद्या वाईट शक्तीच्या प्रभावाखाली येऊ शकता असं म्हणतात. त्यामुळे संध्याकाळी कांदा-लसूण देण्याचं टाळा.

    First published:

    Tags: Religion, अक्षय तृतीया