जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; 15 दिवस भाड्याच्या खोलीत ठेवलं अन्...

लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; 15 दिवस भाड्याच्या खोलीत ठेवलं अन्...

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Crime in Beed: परळीतील एका तरुणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. तिला 15 दिवस भाड्याच्या रुममध्ये ठेवून हा अत्याचार सुरू होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

परळी, 09 जुलै: अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून (lure of marriage) तिच्यावर 15 दिवस बलात्कार (rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पंधरा दिवसांनंतर किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर आरोपी पीडितेला मारहाण (Beat) करत जातीवाचक शिवीगाळ (Racist abuse) केली आहे. हे संतापजनक कृत्य घडल्यानंतर पीडित मुलीनं परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह (POCSO) अॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrest) केली असून गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. जनक यादव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव असून तो परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील रहिवासी आहे. आरोपी जनक यादवनं एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. यानंतर त्यानं 20 जून 2021 रोजी परळीतील एका लॉजवर नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. हेही वाचा- अमरावती हादरलं, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही. तर त्यानं पीडित मुलीला परळी शहरातील कंडक्टर कॉलनीत भाड्याच्या खोलीत ठेवलं. याठिकाणी आरोपीनं सलग 15 दिवस तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीनं किरकोळ कारणातून भांडण काढत पीडित मुलीला मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत लज्जास्पद वागणूक दिली. हेही वाचा- शिक्षिकेचं विद्यार्थ्यांसोबत घृणास्पद कृत्य, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला VIDEO प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत आरोपीनं रंग दाखवल्यानं पीडित अल्पवयीन मुलीनं परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास संभाजीनग पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात