• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • अमरावती हादरलं, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरामागे नराधमाने केला अत्याचार

अमरावती हादरलं, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरामागे नराधमाने केला अत्याचार

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी हरी उर्फ दिवाकर कराळे विरुद्ध पोस्कोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

  • Share this:
अमरावती, 08 जुलै : अमरावती (amravati) जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन (kholapur police station) अंतर्गत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून  पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी उर्फ दिवाकर कराळे असं या आरोपीचं नाव आहे.  पीडित 15 वर्षीय मुलगी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घराबाहेर निघाली होती. त्यावेळी नराधमाने बळजबरीने तिचा हात पकडून घरामागील जागेत नेत तिच्यावर अत्याचार केला.

वर्षभरात स्टार्टअप कंपनीची 100 कोटींची कमाई; तुम्हीही करू शकता हा Online व्यवसाय

रात्रीला बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या आईने शोध घेतला असता मुलगी घरामागे रडत असल्याचे आढळून आले. आईने जेव्हा मुलीची विचारपुस केली असता मुलीने आपबिती सांगितली. त्यामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला. मुलीच्या आईने तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दिली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी हरी उर्फ दिवाकर कराळे विरुद्ध पोस्कोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या संदर्भात अधिक तपास खोलापूर पोलीस करत आहेत. बीडमध्ये 15 वर्षाच्या मुलाने केला 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार दरम्यान, बीडमधील माजलगावमध्ये 6 वर्षीय चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून, परिसरातच राहणाऱ्या एका 15 वर्षीय नराधम मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंचं मंत्रीपदी प्रमोशन झाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया दरम्यान, या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध कलम 376, आयटीसीच्या कलम 4,5,6 सह पोस्को प्रमाणे, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Published by:sachin Salve
First published: