नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 29 डिसेंबर : प्रेमात (love affair) पडलेली माणसं कधी काय करतील याची नेम नाही. एका अल्पवयीन मुलीवर (girlfriend ) प्रेम करणाऱ्या तरुणाला आत्महत्या (boyfriend suicide) केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या वडिलांनी आपल्या प्रेयसीला आपल्यापासून दूर नेल्याच्या विरहामुळे या तरुणाने टोकालेच पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. वर्ध्यातील वायगाव येथील सौरभ अनिल मस्के (वय 21वर्ष) याने येथीलच एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत फुस लावून पळून नेले होते. त्यावरून मुलीच्या वडिलांनी देवळी पोलीस ठाण्यात सौरभ विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसानी शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आणि आरोपी सौरभ मस्के याच्यावर कलम 363 भादवी तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते. ( लग्नानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्याने दाखवला आपला बिकिनी अवतार; पाहताच नवऱ्याने… ) न्यायालयाने जामीन फेटाळून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यामुळे तो कारागृहात गेला व तिकडून सुटका झाल्यावर सौरभने आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावातच एक पान टपरी घेऊन किरायाने राहत होता. पण समाजातील लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असल्याने त्याच्या मनामध्ये चिंतेने घर केले. आपली यामुळे समाजात खूप बदनामी झाली आहे. यामुळे त्याने कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं होतं. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे त्याने आपली पान टपरी उघडली. दिवसभर व्यवसाय केला परंतु त्याच्या मनात चिंता सतावत असल्याने त्याने त्याच ठिकाणी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास टॉवेलने गळफास लावून जगाचा निरोप घेतला. ( विवाहित पुरुषांनी आहारात या 5 गोष्टी घ्यायलाच हव्यात; काही दिवसात दिसतील परिणाम ) या प्रकरणी देवळी पोलिसानी कलम 174 जा.फो. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सौरभच्या जाण्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.